Amitabh Bachchan, Rajinikanth, Priyanka Chopra (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरस (Coronavirus) भारतात दाखल झाल्यानंतर या विषाणूंचा फैलाव अधिक वाढू नये म्हणून सरकार सतर्क होते. वाढता धोका टाळण्यासाठी देश 21 दिवस लॉकडाऊन करण्यात आला. इतकंच नाही तर विविध माध्यमातून नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचे कार्य चालू होते. अनेक नेते, बॉलिवूड सेलिब्रेटी, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर जनजागृती कार्यात सहभागी झाले. दरम्यान अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra), रजनीकांत (Rajinikanth), रणबीर कपूर (Ranbir Kapoor), आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या सह अनेक सेलेब्रिटी हे एका शॉर्ट फिल्ममध्ये एकत्र झळकणार आहेत. कोविड 19 यासंबंधित जागरुकता निर्माण करणारी ही फिल्म आहे. 'फॅमेली' (Family) असे या शॉर्ट फिल्मचे नाव असून प्रसून पांडे यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.

घरी सुरक्षित राहणे, स्वच्छता बाळगणे, वर्कफ्रॉम होम आणि सोशल डिस्टसिंग यावर ही फिल्म आधारीत आहे. ही शॉर्ट फिल्म प्रेक्षकांना आज, 6 एप्रिल रोजी सोनी टीव्ही (Sony TV) वर रात्री 9 वाजता पाहायला मिळेल. याचा एक व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत अमिताभ बच्चन फिल्मबद्दल सर्व अपडेट्स देत आहेत.

पहा व्हिडिओ:

कोरोना व्हायरसच्या या गंभीर संकटात अनेक सेलिब्रेटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. अनेकांनी आपआपल्या परीने मदत करत सरकारच्या प्रयत्नांना साथ दिली आहे. प्रियंका चोप्राने पंतप्रधान साहाय्यता निधीसह अनेक संस्थांना सढळ हस्ते मदत केली आहे. तर अमिताभ बच्चन यांनी ऑल इंडिया चित्रपट कर्मचारी संस्थेशी संबंधित तब्ब्ल 1 लाख मजुरांना महिन्याभराचे किराणा वाटप करणार आहेत. या सोबत अनेक सेलिब्रेटींनी आपले आर्थिक योगदान देत घरी सुरक्षित राहण्याचे आवाहनही चाहत्यांना वारंवार केले आहे.