Coronavirus विरुद्ध लढाईत अमिताभ बच्चन यांनी उचलली मोठी जबाबदारी; फिल्म असोसिएशन च्या 1 लाख मजुरांना वाटणार महिन्याचा किराणा
ऑल इंडिया चित्रपट कर्मचारी संस्थेशी संबंधित तब्ब्ल 1 लाख रोजंदारी मजुरांना एका महिन्याचा किराणा वाटणार असल्याची घोषणा अमिताभ बच्चन यांनी केली आहे. बिग बींच्या या निर्णयाला सोनी नेटवर्क इंडिया (Sony Network India) आणि कल्याण ज्वेलर्स (Kalyan Jewellers) कडूनही पाठिंबा दर्शवण्यात आला आहे.
महानायक बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी सुद्धा आता कोरोनाविरुद्ध (Coronavirus) लढ्यात आपले योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ऑल इंडिया चित्रपट कर्मचारी संस्थेशी संबंधित तब्ब्ल 1 लाख रोजंदारी मजुरांना एका महिन्याचा किराणा वाटणार असल्याची घोषणा अमिताभ यांनी केली आहे. बिग बींच्या या निर्णयाला सोनी नेटवर्क इंडिया (Sony Network India) आणि कल्याण ज्वेलर्स (Kalyan Jewellers) कडूनही पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. "आपण ज्या परिस्थितीत आता अडकलो आहोत त्याला एकजुटीने सामना करण्याची आवश्यकता आहे. अशावेळी अमिताभ बच्चन यांनी घेतलेल्या या निर्णयाचे आपण समर्थन करतो, आणि त्यानुसार 1 लाख घरांना आमच्या वतीने मोफत किराणा देण्यात येईल" अशी अधिकृत घोषणा सोनी नेटवर्क आणि कल्याण ज्वेलर्सच्या वतीने करण्यात आली आहे.(कोरोना व्हायरस बाधितांना विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी शाहरुख खान याने दिली ऑफिसची जागा; BMC ने ट्विट करत मानले आभार)
प्राप्त माहितीनुसार, देशातील महत्वाच्या आणि मोठ्या किराणा मालाच्या दुकानांना जोडून त्यांचे काही डिजिटल बारकोड फिल्म असोसिएशनच्या संबंधित कर्मचारी आणि मजूर वर्गाला वाटण्यात आले आहेत, ज्यावरून या गरजूना संबंधित स्टोर मधून खरेदी करण्यात येणार आहे. तर काहींना शक्य असेल तितकी आर्थिक मदत सुद्धा केली जाणार आहे असेही सोनी आणि कल्याण ज्वेलर्सच्या वतीने सांगण्यात आले आहे. दरम्यान ही मदत नेमकी कधीपर्यंत पोहचेल याबाबत अजूनतरी स्पष्ट माहिती मिळालेली नाही.
दरम्यान,आपण सर्वांनी काल सोनी वाहिनीवर आपण आज म्हणजेच 6 एप्रिल रोजी 9 वाजता एक महत्वाची बाब सांगणार असल्याचे कमर्शियल पाहिले असेल, तर ही एक शॉर्ट फिल्म असल्याचे म्हंटले जात आहे, जी आज सोनी वाहिनीवरून प्रदर्शित करण्यात येणार आहे. ही शॉर्ट फिल्म प्रसून पांडे दिग्दर्शित आहे, यामध्ये घरी राहण्याचे, स्वच्छता बाळगण्याचे आणि सोशल डिस्टंसिंगचे फायदे मांडण्यात आले आहे. यामध्ये रजनीकांत, रणबीर कपूर, प्रियांका चोपडा जोनास, आलिया भट्ट, सोनाली कुलकर्णी, दिलजीत दोसांझ सहित अनेक दिग्गज मंडळी पाहायला मिळणार आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Apr 06, 2020 10:46 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

