अमिताभ बच्चन यांनी कुटुंबातील 3 पिढ्यांचा फोटो शेअर करत ताज्या केल्या जून्या आठवणी (See Pic)
Amitabh Bachchan with Abhishek Bachchan & Agstya Nanda (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सोशल मीडियावर अगदी अॅक्टीव्ह असतात. आपल्या पोस्ट, फोटोज, व्हिडिओजमधून चाहत्यांना खूश करण्याची एकही संधी ते सोडत नाही. आपल्या आयुष्यातील रंजक गोष्टी शेअर करुन बिग बी फॅन्ससोबत कनेक्टेड राहतात. आता देखील अमिताभ बच्चन यांनी आपल्या नातवासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात अभिषेक बच्चनही (Abhishek Bachchan) दिसत आहे.

हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत बिग बी यांनी लिहिले, "वडील... मुलगा... नातू... काही वर्षांपूर्वी... हाताची घडी घातली होती आणि प्लॅन केला नव्हता... बस्स होऊन गेलं..." (Hindi Word for Mask: मास्कला हिंदीमध्ये काय म्हणतात? अमिताभ बच्चन यांनी हा खास सेल्फी शेअर करत दिले उत्तर)

पहा फोटो:

 

View this post on Instagram

 

Father .. Son .. Grandson .. some years ago .. the folded hands are unplanned .. just happened

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on

बिग बींनी शेअर केलेल्या फोटोमध्ये खुद्द ते स्वतः, अभिषेक बच्चन आणि नातू अगस्त्य नंदा (Agstya Nanda) एकाच स्थितीत दिसत आहे. बिग बींनी पोस्टमध्ये नमूद केल्याप्रमाणे हा फोटो नक्कीच जूना आहे कारण यात अगस्त्य खूप लहान दिसत आहे. अगस्त्य बिग बींची मुलगी श्वेता नंदा (Shweta Nanda) हिचा मुलगा आहे. सध्या घरातच कुटुंबियांसोबत वेळ घालवत असलेल्या बिग बी यांनी खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

लवकरच बिग बी सोनी टीव्ही वरील हिट गेम शो 'कौन बनेगा करोड़पति 12' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याशिवाय अयान मुखर्जी यांच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमातून रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यासह झळकणार आहेत.