अमिताभ बच्चन (Photo Credits: Facebook)

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Corona Test Positive) आली आहे. त्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयात (Nanavati Hospital) दाखल करण्यात आले आहे. नानावटी रुग्णालय प्रशासनाने या वृत्ता दुजोरा दिला आहे. तसेच स्वतः अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली आहे.

अमिताभ यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी रुग्णालयात दाखल झालो आहे. आणखी काही चाचण्या केल्या जाणार आहेत. मागील 10 दिवसात जे माझ्या संपर्कात आले होते, त्यांनीही आपली कोरोना चाचणी करावी,' असं आवाहनदेखील अमिताभ यांनी ट्विटमध्ये केलं आहे. (हेही वाचा - अभिनेत्री रेखा यांच्या सुरक्षारक्षकाला कोरोना विषाणूची लागण; BMC ने लावली नोटिस)

दरम्यान, अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. अनेकांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. अमिताभ यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं म्हटलं जात होतं. त्यानंतर काही वेळातचं अमिताभ यांनी स्वत: याबद्दल खुलासा केला आहे.