अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा आणि मिझान जाफरी यांच्या अफेअर्सच्या चर्चांना सोशल मीडियात उधाण; पहा फोटो
Navya Naveli Nanda with Meezan Jaffrey (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) सोशल मीडियावर भलतीच अॅक्टीव्ह असते. त्याचबरोबर अनेकदा ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेतही असते. आता पुन्हा एकदा सोशल मीडियात तिची चर्चा सुरु आहे. त्याचे कारणही तसे खास आहे. अभिनेता जावेद (Javed Jaffrey) याचा मुलगा मिझान जाफरी (Meezan Jaffrey) याच्यासोबत नव्या नवेली रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र मिझानने नव्या फक्त मैत्रिण असल्याचे म्हणत अफेअर्सच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. (नव्या नवेली हिचा न्यूयॉर्क च्या रस्त्यावर वर्कआऊट; हॉट व्हिडिओ व्हायरल)

पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत मिझान म्हणाला की, "मी रिलेशनशीपमध्ये आहे. पण नव्यासोबत नाही. मी तिच्यासोबत फोटो काढले याचा अर्थ ती माझी गर्लफ्रेंड नाही. जेव्हा खऱ्या गर्लफ्रेंडसोबत माझे फोटो समोर येतील तेव्हा तुम्ही कदाचित यावर विश्वास ठेवाल."

तसंच कोणाच्याही वैयक्तिक आयुष्याबद्दल टिपणी करताना मीडियाने थोडं भान राखायला हवं. उगाच तर्क वितर्क लावण्यात काही अर्थ नाही. माझ्याबद्दल काय बोललं जात याने मला फरक पडत नाही. मात्र नव्या बद्दल अशा चर्चा होणं चुकीचं ठरेल, असं मिझान म्हणाला.

Navya Naveli Nanda Post:

 

View this post on Instagram

 

#mine 💓

A post shared by Navya Naveli Nanda (@naavyananda) on

मिझानने संजय लीला भन्सालींच्या 'मलाल' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले असून या सिनेमात आपल्याला मराठी मुलगा आणि उत्तर भारतीय मुलगी यांची प्रेमकथा पाहायला मिळते. या सिनेमाचे दिग्दर्शन मंगेश हडवले यांनी केले असून संजय लीला भन्साली, भूषण कुमार, महावीर जैन आणि क्रिशन कुमार यांनी एकत्रितपणे निर्मितीची सुत्रं सांभाळली आहेत.