Malaal Trailer: संजय लीला भन्साली यांच्या 'मलाल' सिनेमाचा ट्रेलर आऊट; सलमान खान याने खास ट्विट करत दिल्या शुभेच्छा
Malaal Trailer (Photo Credits: Youtube)

बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करणाऱ्या पद्मावत (Padmaavat) सिनेमानंतर संजय लीला भन्साली (Sanjay Leela Bhansali) आपला नवाकोरा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'मलाल' (Malaal) असे या सिनेमाचे नाव असून सिनेमात नवीन चेहऱ्यांना पसंती देण्यात आली आहे. शर्मिन सहगल (Sharmin Segal) आणि मीजान (Meezaan) हे कलाकार सिनेमातून पर्दापण करत आहेत. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

सिनेमाची कथा ही शिवा आणि आस्थाची कहाणी आहे. वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे हे दोघे कसे प्रेमात पडतात आणि दोघांच्या नात्यातील चढउतार याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. भन्सालींचे वैशिष्ट्य असणारे भव्यदिव्य सेट्स या सिनेमात नाहीत तर सिनेमाला लोकल टच देत चाळीत शूटिंग करण्यात आले आहे.

पहा ट्रेलर:

सलमान खानने देखील सिनेमाचा ट्रेलर ट्विटरवर शेअर करत शर्मिन सहगल हिला पर्दापणासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळेस शर्मिन सोबतचा फोटो शेअर करत सलमान खानने लिहिले की, "सुंदर शर्मिनला चंदेरी पडद्यावर मलाल या डेब्यू सिनेमातून पाहण्याची वेळ आली आहे. हा नवीन प्रवास तुझ्यासाठी प्रेम आणि लक घेऊन येईल, अशी आशा आहे."

सलमान खान ट्विट:

या सिनेमाचे दिग्दर्शन मंगेश हडवले यांनी केले असून संजय लीला भन्साली, भूषण कुमार, महावीर जैन आणि क्रिशन कुमार यांनी एकत्रितपणे निर्मितीची सुत्रं सांभाळली आहेत. हा सिनेमा 28 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.