अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली हिचा न्यूयॉर्क च्या रस्त्यावर वर्कआऊट; हॉट व्हिडिओ व्हायरल
Navya Naveli Nanda (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) अनेकदा कोणत्यातरी कारणाने चर्चेत असते. सोशल मीडियावरील तिचे फोटोज बरेचदा व्हायरल होतात. नव्या नवेलीची लोकप्रियता एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. सध्या नव्या हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओत नव्या न्यूयॉर्क मधील रस्त्यावर वर्कआऊट करताना दिसत आहे. नव्याच्या फॅन क्लबने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

या व्हिडिओत नव्याने नियॉन रंगाचा टॉप आणि ग्रे टाईट्स परिधान केले आहेत. तिचा फिटनेस अनेकांना प्रेरित करेल. फिटनेससाठी ती घेत असलेली मेहनत आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळते.

पहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

#fitness . . . . . .#navyananda #navyanavelinanda

A post shared by Navya Naveli Nanda® (@naavyananda) on

नव्या न्यूयॉर्क येथे राहत असून ती फोरडम युनिव्हर्सिटीत शिकत आहे. अलिकडेच ती 'मलाल' सिनेमातील अभिनेता मीजान जाफरी सोबतच्या मैत्रीमुळे चर्चेत होती. यापूर्वी शाहरुख खान याचा मुलगा आर्यन सोबत नव्याची मैत्री चर्चेचा विषय ठरली होती.