बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे सोशल मिडियावर बरेच सक्रिय असतात. आपल्या जगभरातील लाखो चाहत्यांसोबत संवाद साधता यावा यासाठी सोशल मिडियावर ते अनेक विषयांवर चर्चा देखील करत असतात. सध्या देशभरात लॉकडाऊन सुरु असल्यामुळे सोशल मिडिया हे एकच माध्यम सर्व कलाकारांना आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवत आहे. म्हणूनच काल बैसाखीच्या शुभेच्छा देण्यासाठी बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या इन्स्टाग्राम एक पोस्ट शेअर करुन आपल्या चाहत्यांना छान शुभेच्छा दिल्या. चाहत्यांनीही त्यांना शुभेच्छा द्यायला सुरुवात केली. मात्र एका महाभागाने ज्याला आपण Toller म्हणतो त्याने असे काही कमेंट केले ज्याचा बिग बींना प्रचंड राग आला.
झाले असे की, अमिताभ बच्चन यांनी आपल्या 'सुहाग' चित्रपटातील गाण्यामधील एका सीनचा फोटो शेअर करुन चाहत्यांना बैसाखीच्या शुभेच्छा दिल्या. त्यावर एका ट्रोलर अत्यंत घाणेरड्या शब्दांत बिग बीं ना एक प्रश्न विचारला ज्याचे अमिताभ बच्चन यांनी शुद्ध भाषेत पण त्याचे कान पिळले.
हेदेखील वाचा- बिग बी अमिताभ बच्चन COVID-19 मुळे देशात निर्माण झालेल्या स्थितीमुळे गरजूंना रोज दान करत 2000 खाद्यपदार्थांचे पॅकेट
पाहूया ते कमेंट:
या यूजरने बिग बी यांना 'ऐश्वर्या कहाँ है बुड्ढे' असा प्रश्न विचारला त्यावर बिग बीं नी 'ती अशा ठिकाणी आहे जिथे तुम्ही कधीच पोहचू शकणार नाही, बाप रे बाप' अशा कडक शब्दांत उत्तर दिले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर महामानवाची यशोगाथा आता पहा हिंदीमधून; स्टार भारत वर आजपासून होणार सुरु : Watch Video
बिग बीं चे हे उत्तर समस्त ट्रोलर्स बांधवांच्या गालावर चांगलीच चपराक असेल. अमिताभ अनेकदा ट्रोल झालेले आहेत. मात्र काहींच्या वाह्यात कमेंट्स पाहून अमिताभ त्यांना सभ्य भाषेत पण कानउघडणी करतील अशा शब्दांत उत्तर देतात.