आलिया भट्टचा 'सडक २' पाहायचाय? मग काही काळ वाट तर पहावीच लागेल!
दिग्दर्शक महेश भट्ट आणि अभिनेत्री आलिया भट्ट (संग्रहीत आणि संपादित प्रतिमा)

संजय दत्त, पूजा भट्ट, आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर अशी तगडी स्टारकास्ट असलेला आणि महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केलेला 'सडक-२' पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात? तर, मग तुमची ही उत्सुकता आणखी काही काळ कायम राहणार आहे. हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार, याबाबत स्वत: आलिया भट्ट हिने आपल्या इन्स्टाग्राम पेजवरुन माहिती दिली आहे.

आलियाने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'सडक-२' मार्च २०२०मध्ये प्रदर्शित होईल. दरम्यान, आलियाने इन्स्टावरुन एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत चित्रपटची झलक पहायला मिळते. चित्रपटासोबत आणखी एक गोष्ट लक्षवेधी आहे. ती म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश भट्ट करणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून महेश भट्ट तब्बल २० वर्षांनंतर दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत.

 

View this post on Instagram

 

Sadak 2 - A Mahesh Bhatt Film @maheshfilm @poojab1972 @duttsanjay #adityaroykapoor

A post shared by Alia (@aliaabhatt) on

दरम्यान, आलियाची वडील महेश भट्ट आणि बहिण पूजा सोबत काम करण्याची (स्क्रिन शेअरींग) ही पहिलीच वेळ आहे.