Akshay Kumar ने Ram Setu चित्रपटाच्या चित्रीकरणाला केली सुरुवात; सेटवरून फोटो शेअर करत चाहत्यांना विचारला 'हा' प्रश्न
अक्षय कुमार (Image Credit: Twitter)

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) गेल्या काही दिवसांपासून आपल्या रामसेतू (Ram Setu) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताचं या चित्रपटासाठी अक्षय कुमार अयोध्येत पोहोचला. जिथे त्याने एक शॉट दिला. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. अक्षय कुमारने चित्रपटाच्या सेटवरून एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याचे केस वाढलेले दिसत आहेत. तसेच त्याने चष्मा घातला आहे. या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिज आणि नुसरत भरूचादेखील अक्षय कुमारसोबत दिसणार आहेत.

हा फोटो शेअर करताना अक्षय कुमारने म्हटलं आहे की, 'हा चित्रपट त्यांच्यासाठी खूप खास आहे. ज्याचे शूटिंग सुरू झाले आहे. माझ्यासाठी हा प्रवास सुरू झाला आहे. चित्रपटात मी पुरातत्वशास्त्रज्ञाची भूमिका साकारत आहे. मला माझ्या लूकवरील आपली मते जाणून घ्यायची आहेत, ती माझ्यासाठी खूप महत्वाची आहेत.' (वाचा - Fact Check: दारुच्या नशेत असताना अभिनेता अजय देवगन ला दिल्लीत मारहाण? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमागील सत्य जाणून घ्या)

अक्षय कुमारच्या रामसेतू चित्रपटचा दिग्दर्शन अभिषेक शर्मा करीत आहे. या चित्रपटाची कथा अयोध्यापासून सुरू होते आणि श्रीलंकेपर्यंत पोहोचते. अक्षय या व्यतिरिक्त, बेल बॉटम, अंतरंगी रे, रक्षा बंधन, पृथ्वीराज आणि हाऊसफुल सारख्या चित्रपटात दिसणार आहे.

दरम्यान, रामसेतुमध्ये अक्षय एका पुरातत्व तज्ञाच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षय पहिल्यांदाचं अशी व्यक्तिरेखा साकारत आहे. या लूकवर अक्षयने चाहत्यांना त्यांचे मत विचारले आहे. चित्रपटाची कथा बहुदा रामायण काळाच्या राम सेतूच्या शोधावर आधारित आहे, ज्याचा पुरावा काही वर्षांपूर्वी सापडला होता. भारत आणि श्रीलंका दरम्यान समुद्रात स्थित राम सेतूला अ‍ॅडम्स ब्रिज म्हणूनही ओळखले जाते. रामायण आख्यायिकेनुसार रावणाने सीतेचे अपहरण केल्यानंतर रामाने त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या वानर सेनेच्या मदतील रामसेतू तयार केला होता.