Fact Check: दारुच्या नशेत असताना अभिनेता अजय देवगन ला दिल्लीत मारहाण? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमागील सत्य जाणून घ्या
Ajay Devgan Viral Video (PC - Twitter)

Fact Check: बॉलिवूड अभिनेता अजय देवगन (Ajay Devgan) नेहमीच आपल्या अप्रतिम अभिनयासाठी ओळखला जातो. नुकताचं अभिनेत्याचा चित्रपट तान्हाजी ला अनेक पुरस्कार मिळाले. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये मद्यधुंद अजय देवगणला दिल्लीत जोरदार मारहाण केल्याचं म्हटलं जात आहे. दिल्लीत मध्यरात्री दोन गटात भांडण झालं. यात अभिनेत्याला चोप देण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत असा दावा केला जात आहे की, व्हिडिओत मारहाण झालेली व्यक्ती दुसरे कोणी नाही तर बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगन आहे. अजय देवगन यावेळी नशेत होता. अभिनेत्याचं कार पार्किंगवरुन भांडण सुरू आहेृ. त्यानंतर दोन गटांमध्ये जोरदार मारामारी झाली. परंतु, या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये कोणाचाही चेहरा दिसत नाही. व्हिडिओमध्ये दिसत असलेली व्यक्ती अजय देवगन सारखी दिसत आहे. मात्र, यावरून असं म्हटलं जाऊ शकत नाही की, ती व्यक्ती अजय देवगनचं आहे. (वाचा - Fact Check: महिला व बालकन्या योजना, जिजाऊ/जिजामाता योजनेअंतर्गत कोरोना काळात विधवा झालेल्यांना प्रतिवर्षी 50 हजार मिळतील? जाणून घ्या सोशल मीडीयातील या वायरल मेसेज मागील सत्य)

दरम्यान, एका ट्विटर यूजर्सने या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात पांढरा शर्ट परिधान केलेल्या एका व्यक्तीला मारहाण केली जात आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना या वापरकर्त्यानं लिहिलं की, 'तो अजय देवगण आहे की, नाही हे मला माहिती नाही. पण शेतकरी आंदोलनाबाबत लोकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून मार खाणारी व्यक्ती अजय देवगण आहे असा दावा केला जात आहे.'

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ दिल्लीच्या विमानतळाजवळील आहे. रविवारी मध्यरात्री कार पार्किंगवरून या ठिकाणी दोन गटात जोरदार भांडण आणि धक्काबुक्की झाली. यातील एका गटाने एका मद्यधुंद व्यक्तीला चांगलाचं चोप दिला. परंतु, ही व्यक्ती अजन देवगन नाही, हे स्पष्ट झालं आहे.