अक्षय कुमार (Akshay Kumar) स्त्री या चित्रपटात कॅमिओ करताना दिसले. अक्षय कुमार या चित्रपटात पाहुणा कलाकाराची भूमिका केली असली तरी त्याच्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. अक्षय कुमार ही आता मॅडॉकच्या हॉरर युनिव्हर्सचा एक महत्त्वाचा कलाकार असणार हे आता स्पष्ट झाले आहे. स्त्री 2 (Stree 2) चित्रपटाच्या अखेरीस अक्षय कुमार राक्षसी रुपता दिसतो. चित्रपटातील हा शेवट अनेकांना थक्क करणारा आणि पुढे काय होणार याच्या उत्कंठा वाढवणारा ठरला. असे असले तरी अक्षयचा एक नवा हॉररपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

पाहा अक्षय कुमारची पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

 

अक्षय कुमारने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर कला होता. अक्षय कुमारच्या नव्या चित्रपटाचं पोस्टर असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान अक्षय कुमार प्रियदर्शन यांच्या हॉरर चित्रपटात कमा करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत होती. त्यात अक्षय कुमारने एक व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ याच चित्रपटाचा भाग असल्याचं म्हटलं जात आहे. अक्षयने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहले आहे की "गणपती बाप्पा मोरया आजच्या दिवसापेक्षा भारी क्षण कोणताच असून शकत नाही. हे काय आहे, याचा खुलासा माझ्या वाढदिवशी होईल." दरम्यान अक्षय कुमारचा वाढदिवस 9 सप्टेंबर रोजी आहे.