Dog Attack On Akshay Kumar's Daughter: अक्षय कुमार याच्या मुलाला कुत्र्याचा चावा, दोन्ही हातांना जखमा, पत्नी ट्विंकल खन्ना यांनी दिली माहिती

बॉलिवूड चित्रपटांपासून (Bollywood Movie) दूर असलेली ट्विंकल खन्ना आता तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी आणि मुलांना पूर्ण वेळ देत आहे. अक्षय कुमारसोबतच्या (Akshay Kumar) लग्नानंतरच तिने तिच्या वैवाहिक जीवनाला पूर्ण वेळ देण्यास सुरुवात केली आणि आता ती आपल्या मुलांच्या संगोपनात व्यस्त आहे. अलीकडेच ट्विंकल आणि अक्षयची मुलगी नितारा (Nitara) हिच्या दोन्ही हातांना तिच्याच पाळीव कुत्र्याने चावा घेतला होता. यामुळे त्रस्त झालेल्या ट्विंकल खन्नाने आपल्या मुलीच्या भावना चाहत्यांसोबत शेअर केल्या. ट्विंकल खन्नाने (Twinkle Khanna) खुलासा केला की तिची मुलगी नितारा हिला ख्रिसमसच्या सुट्टीत पाळीव कुत्र्याने 'तिच्या दोन्ही हातांना चावा घेतला'. अभिनेत्री-लेखिका बनलेली ट्विंकल तिच्या चुलत भावाचा पाळीव कुत्रा फ्रेडी आणि तिच्या मुलीच्या प्रेमाविषयी उघडपणे बोलली.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna)

ट्विंकलने सांगितले की, 'तीन रेबीज लसीकरण आणि एक धनुर्वात लसीकरण' घेतल्यानंतरही निताराने तिच्या पाळीव प्राण्याचे संरक्षण केले. मुलीने याला फक्त अपघात म्हटले. या घटनेची आठवण करून देताना ट्विंकल खन्ना म्हणाली, 'या ख्रिसमसला, फ्रेडी आजूबाजूला असताना कोणीतरी चुकून मुलांसमोर चिकनची प्लेट ठेवली. त्याने प्लेटवर उडी मारली आणि तुकडे गिळायला सुरुवात केली. माझी 11 वर्षांची मुलगी (नितारा) चिकन धरून होती जेव्हा फ्रेडीने तिच्या हातातील तुकडा तोंडाने खेचण्याचा प्रयत्न केला त्यावेळी निताराच्या दोन्ही हातांवर चावला. ट्विंकलने कुत्रा चावल्यानंतर निताराची प्रतिक्रियाही सांगितली आहे.

ट्विंकलने लिहिले की, 'रेबीजचे तीन इंजेक्शन आणि नंतर टिटॅनसचा शॉट, असे घेऊनही तीने सांगितले की फ्रेडीविरुद्ध तीची कोणतीही तक्रार नाही, हा अपघात होता. त्याला मला चावायचे नव्हते आणि जोपर्यंत फ्रेडी ठीक आहे तोपर्यंत काही फरक पडत नाही. जर मी चुकून त्याची बोटे चावली असती तर? त्याने तक्रार केली असती का? असा प्रश्न तिने विचारला.