Aftab Shivdasani Tests Positive For Coronavirus: प्रसिद्ध अभिनेता आफताब शिवदासानीला कोरोना विषाणूची लागण; घरीच क्वारंटाईन होत असल्याची दिली माहिती
Aftab Shivdasani (Photo Credits: Facebook)

दिवसेंदिवस देशातील कोरोना व्हायरसचा (Coronavirus) कहर वाढतच आहे. कोरोनाची हजारो प्रकरणे रोज समोर येत आहेत. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीसुद्धा या विषाणूला बळी पडले आहेत. आता सुप्रसिद्ध अभिनेता आफताब शिवदासानी (Aftab Shivdasani) कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. यासह, त्याने कोरोनाच्या लक्षणांबद्दल देखील सांगितले आहे. आफताब शिवदासानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात तो म्हणतो, 'सर्वांना माझे नमस्कार, मला आशा आहे की तुम्ही सर्वजण तंदुरुस्त आणि फिट असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल.’

‘अलीकडेच मला ड्राय कफ आणि सौम्य ताप अशी लक्षणे दिसली. त्यानंतर मी माझी कोरोना विषाणूची चाचणी केली असता दुर्दैवाने ती सकारात्मक असल्याचे आढळून आले आहे. यानंतर, डॉक्टर आणि प्रशासनाच्या देखरेखीखाली मला घरी अलग ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.’

त्याने पुढे लिहिले आहे- 'गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना मी आवाहन करू इच्छितो की, त्यांनी त्यांच्याही कोरोना विषाणूच्या चाचण्या करून घ्या म्हणजे ते सुरक्षित राहू शकतील. आपल्या प्रार्थना आणि पाठींब्यामुळे मी लवकरच बरा होऊन माझे जनजीवन सुरु करेन. सर्वांनी मास्क आणि सॅनिटायझर वापरणे सुरू ठेवा, यामुळे आपले प्राण वाचू शकतात. आपण सर्वजण मिळून ही लढाई जिंकू.’ (हेही वाचा: टीव्ही अभिनेत्री सारा खान हिला कोरोनाची लागण; सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती)

पहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

🙏🏼🍀❤️

A post shared by Aftab Shivdasani (@aftabshivdasani) on

दरम्यान, याआधी बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपुरला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याची गर्लफ्रेंड मलाइका अरोड़ा हिला सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे समजत आहे. मलाइका ची बहीण अमृता अरोड़ा हिने याविषयी माहिती दिली होती, तर मलाइकाने सुद्धा या माहितीची पुष्टी करत आपण कोरोनाबाधित आहोत असे सांगितले. आपल्यात कोरोनाची लक्षणे नाहीत मात्र रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मी स्वतःला घरातच आयसोलेट करुन घेतले आहे.