Actress Sara Khan Tests Positive for COVID-19: टीव्ही अभिनेत्री सारा खान हिला कोरोनाची लागण; सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती
Sara Khan (Photo Credits: Instagram)

Actress Sara Khan Corona Positive: टीव्ही अभिनेत्री सारा खान (Sara Khan) हिला कोरोनाची लागण झाली आहे. सारा हिने स्वतः सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली. कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तिने स्वतः होम क्वारंटाईन केले आहे. तसंच प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही तिने चाहत्यांना केले आहे. आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये तिने लिहिले, "दुर्दैवाने माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टर आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी स्वतःला घरातच क्वारंटाईन केले आहे. माझी प्रकृती ठिक आहे आणि लवकर तब्येत सुधारेल, अशी आशा करते."

सारा खान हिच्या पोस्टवर अंकित भल्ला, जय भानुशाली, दिशा परमार, गरिमा जैन यांसारख्या कलाकार मित्रांनी कमेंट्स केल्या आहेत. तसंच साराची प्रकृती लवकरच सुधारावी यासाठी प्रार्थनाही केली आहे. (Malaika Arora Tested COVID 19 Positive: अर्जुन कपुर पाठोपाठ मलाइका अरोड़ा ला सुद्धा कोरोनाची लागण)

Sara Khan Post:

 

View this post on Instagram

 

🙏🙏🙏

A post shared by sara Khan (@ssarakhan) on

स्टार प्लसचा टीव्ही शो 'बिदाई... सपना बाबुल का' यामधून सारा घराघरात पोहचली होती. या मालिकेतील साराच्या भूमिकेतील तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर सारा 2010 मध्ये सलमान खान याच्या लोकप्रिय रियालिटी शो 'बिग बॉस' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. बिग बॉसच्या घरात पर्दापण झाल्यानंतर सारा खान प्रचंड चर्चेत राहिली.

कोरोना व्हायरस संसर्गाचा धोका दिवसागणित वाढत आहे. यापूर्वी अनेक कलाकारांना कोरोना संसर्ग झाला आहे. बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर, अभिनेत्री मलायका अरोरा यांनाही कोरोनाची  बाधा झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. अमिताभ बच्चन, अभिषेक-ऐश्वर्या बच्चन आणि आराध्या बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली होती. तसंच अनेक टीव्ही कलाकारही कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत. काहींनी यावर यशस्वीरीत्या मात केली आहेत. तर काहींवर अद्यापही उपचार सुरु आहेत.