Shraddha Kapoor(PC - Facebook)

Happy Birthday Shraddha Kapoor: बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टारकिड्स आहेत ज्यांचे नशीब ज्यांना सिनेसृष्टीचा वारसा मिळालेला असताना ते बॉलिवूडमध्ये भक्कम पाय रोवू शकले नाही. तर काही असे स्टार्स आहेत ज्यांना बॉलिवूड वारसा मिळूनही स्वत:च्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये भक्कम पाय रोवले. त्यातीलच एक म्हणजे अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor).. अत्यंत कमी कालावधीत तिने आपल्यातील कलागुणांच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले. मात्र याच श्रद्धाने वयाच्या 16 वर्षी बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसोबत काम करण्यास नकार दिला होता. हे ऐकले तरी कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र हे खरे आहे.

श्रद्धा कपूर आज 34 वर्षांची झाली आहे. मात्र 16 वर्षांची असताना तिने एक धडाडीचे पाऊल उचलले होते. श्रद्धा ने 23 वर्षाची असताना 'तीन पत्ती' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, "मी 15-16 वर्षाची असल्यापासूनच मला चित्रपटांच्या ऑफर्स येत होत्या. मात्र तेव्हा मला माझे शालेय शिक्षण पूर्ण करायचे होते. कॉलेजला जायचे होते. त्या काळात चित्रपटांना नकार देणे माझ्यासाठी सोपे नव्हते. पण मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करु इच्छित होती. म्हणून मी सलमान खानसोबत काम करण्याची मोठी संधी हुकली." हेदेखील वाचा- Ek Villain Returns: 'एक व्हिलन रिटर्न्स' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात, दिशा पटानी हटके अंदाजात केली घोषणा

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

श्रद्धा सध्या आपल्या कुटूंबासोबत मालदिवमध्ये आहे. आपला भाऊ प्रियांक शर्माच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशन मध्ये ती एन्जॉय करताना दिसत आहे. तिचा कथित बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठा देखील तिच्यासोबत आहे. म्हणजेच श्रद्धा कपूर आपला वाढदिवस मालदिवमध्ये साजरा करणार आहे.

श्रद्धा कपूरच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, तिने आपल्या 'नागिण' चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याचबरोबर ती तिच्या हिट फिल्म 'स्त्री' च्या दुस-या पार्टमध्ये 'स्त्री 2' मध्ये सुद्धा दिसेल.