Ek Villain Returns: 'एक व्हिलन रिटर्न्स' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात, दिशा पटानी हटके अंदाजात केली घोषणा
Ek Villain Returns (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते. दरम्यान तिने हटके अंदाजात आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. दिशा पटानी लवकरच 'एक व्हिलन' च्या सिक्वेल 'एक व्हिलन रिटर्न्स' (Ek Villain Returns) मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून दिशा पटानी हटके अंदाजात याबाबत माहिती दिली आहे. दिशा ने एक व्हिलन रिटर्न्स लिहिलेले जॅकेट घालून कॅमे-यासमोर पाठ करुन उभी आहे. त्यावर लिहिलेले नाव दाखत चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असल्याची माहिती तिने दिली आहे.

दिशा ने हा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करुन एक व्हिलन रिटर्न्सच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. पाहा हा फोटो. हेदेखील वाचा- Saina Nehwal Biopic: बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा बायोपिक 'या' दिवशी होणार रिलीज; अभिनेत्री परिणीती चोप्रा दिसणार साइनाच्या भूमिकेत

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani)

मोहित सूरी दिग्दर्शित 'एक व्हिलन' हा चित्रपट 2014 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत होते. तर रितेश देशमुख यांनी व्हिलनची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. ज्यामुळे मोहित सूरीने या चित्रपटाचा दुसरा पार्ट बनविणार असल्याची घोषणा केली होती.

या चित्रपटात दिशा पटानीसह जॉन अब्राहम, अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 11 फेब्रुवारी 2022 मध्ये प्रदर्शित होईल.