Actress Juhi Chawla (PC - Instagram)

महानायक अमिताभ बच्चन, (Amitabh Bachchan) अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan), ऐश्वर्या बच्चन आणि आराध्याला कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झाली आहे. अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी बच्चन कुटुंबियांची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना केली आहे.

अशातचं अभिनेत्री जुही चावलानेदेखील (Juhi Chawla) बच्चन कुटुंबासाठी प्रार्थना केली आहे. जुहीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अमिताभ, अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्याच्या प्रकृतीसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. मात्र, तिने या ट्विटमध्ये एक मोठी चूक केली आहे. त्यामुळे तिला नेटीझन्सनी ट्रोल केलं आहे. (हेही वाचा - 'कसौटी जिंदगी' मालिकेतील पार्थ समथान यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह)

जुहीने या ट्विटमध्ये 'अमितजी, अभिषेक आणि आयुर्वेदा लवकरच बरे होतील,' असं म्हटलं होतं. जुहीने या ट्विटमध्ये आराध्याचं नाव 'आयुर्वेदा' असं लिहिलं आहे. परंतु, एका ट्विटर युझरने याबाबत तिला विचारल्यानंतर तिने ते ट्वीट डिलीट केलं आहे. त्यानंतर काही वेळातचं तिने नवीन ट्विट केलं आहे.

Actress Juhi Chawla Tweet

जुही चावलाच्या चुकीच्या ट्विटमुळे नेटीझन्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, शनिवारी अमिताभ यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर काही वेळातचं अभिषेक यांनादेखील कोरोना विषाणूची लागण झाल्याच स्पष्ट झालं. आज पुन्हा ऐश्वर्या आणि आराध्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे चाहत्यांनी बच्चन कुटुंबियांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे.