 
                                                                 बॉलिवूडमध्ये अनेक कोरोना प्रकरण समोर येत आहेत. शनिवारी महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांची कोरोना चाचणी (Coronavirus Test Positive) पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर आज पुन्हा ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या या दोघींची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
कसौटी जिंदगी की 2 (Kasauti Zindagi Ki 2) या मालिकेमधील अनुराग बसुची (Anurag Basu) भूमिका साकारणारा टेलिव्हिजन अभिनेता पार्थ समथान (Parth Samthan) याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. राज्य सरकारने मालिकांच्या शूटिंगला काही अटींसह परवानगी दिली होती. पार्थची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने 'क्लिक निक्सोन स्टुडिओ'तील शूटिंग थांबविण्यात आले आहे. या स्टुडिओमधील सर्वांच्या कोरोना चाचण्या होणार आहेत. (हेही वाचा - सलमान खान ने शेअर केला शेतात काम करतानाचा फोटो म्हणाला, 'दाने दाने पे लिखा होता हैं, खाने वाले का नाम')
दरम्यान, क्लिक निक्सोन स्टुडिओमध्ये 'कसौटी जिंदगी की', 'कुमकुम भाग्य', 'पवित्र भाग्य' मालिकांची शूटिंग सुरू होती. परंतु, पार्थची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने स्टुडिओमध्ये काम करणाऱ्या सर्वांमध्येचं भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच काही दिवसांकरिता हा स्टुडिओ सील करण्यात आला आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
