सलमान खान ने शेअर केला शेतात काम करतानाचा फोटो म्हणाला, 'दाने दाने पे लिखा होता हैं, खाने वाले का नाम'
Salman Khan (PC - Twitter)

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) लॉकडाऊनमुळे सध्या पनवेल येथील फार्महाऊसमध्ये अडकला आहे. लॉकडाऊन (Lockdown) काळात सलमान खान फार्महाऊसमध्ये विविध कामात व्यस्त असताना पाहायला मिळत आहे. सलमान खानने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेतात काम करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सलमान खान पनवेल येथील फार्महाऊसमध्ये आपल्या कुटुंबासोबत तसेच यूलिया वंतूर (Iulia Vantur) सोबत वेळ घालवत आहे. सलमानने पनवेलमधील फार्महाऊसमधील शेतात लावणी करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टला त्याने 'दाने दाने पे लिखा होता हैं, खाने वाले का नाम. जय जवान, जय किसान', असं कॅप्शन दिलं आहे. (हेही वाचा - 'शनाया' फेम रसिका सुनील ने सोशल मिडियावर एक फोटो शेअर करुन सांगितले 'माझ्या नव-याची बायको' मालिकेतील वेगळेपण; पाहा फोटो)

 

View this post on Instagram

 

Daane daane pe likha hota hai khane wale Ka naam... jai jawan ! jai kissan !

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

सलमानच्या या फोटोला त्याच्या चाहत्यांनी लाईक तसेच कमेंन्ट्स केल्या आहेत. सलमान खान फार्महाऊसमध्ये पावसाचा आनंद घेत आहेत. त्याचा एक व्हिडिओदेखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वूम्प्ला या इन्स्टाग्राम पेजवरून सलमानचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात सलमान ग्रे कलरच्या टी शर्टमध्ये दिसत आहे.