लॉकडाऊन मुळे गेले 4 महिने बंद चित्रपट, मालिकांचे शूटिंग आता हळूहळू सुरु होत आहे. अनलॉक 2 च्या टप्प्यात सरकारने दिलेल्या गाईडलाईन्सच्या आधारावर हे चित्रिकरण सुरु झाले आहे. यामुळे उद्यापासून झी मराठी वाहिनीवरील (Zee Marathi) मालिका पुन्हा सुरु होत आहे. यात गेली अनेक वर्षे सुरु असलेली 'माझ्या नव-याची बायको' (Majya Navryachi Bayko) ही मालिका आता वेगळ्या अंदाजात आपल्या समोर येत आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात प्रेक्षकांची लाडकी जुनी शनाया (Shanaya) म्हणजेच रसिका सुनील (Rasika Sunil) पुन्हा एकदा या सिरियलमध्ये एन्ट्री करतेय. तिच्या येण्याच्या बातमीने तिचे चाहते आनंदून गेले आहेत. त्यातच रसिकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करुन या मालिकेचे वेगळेपणाची एक छोटीशी हिंट चाहत्यांना दिली आहे.
या फोटोमध्ये 'माझ्या नव-याची बायको' ही मालिका जेव्हा सुरु झालेली तेव्हाचे पोस्टर आणि आताचे नवीन पोस्टर तिने दाखवले आहे. या नव्या पोस्टरमध्ये राधिका आणि शनाया सेल्फी काढत असून गुरुनाथला हटकत असल्याचे दिसत आहे. 'माझ्या नव-याची बायको' मालिकेत पुनरागमन करणा-या रसिका सुनील ऊर्फ शनायाने 'हटके' मास्कच्या माध्यमातून स्टाईलने दिली आपल्या रिएन्ट्रीची बातमी; Watch Photo
हे नवीन पोस्टर पाहून असं दिसतय की शनाया आणि राधिका गुरुनाथला चांगलाच धडा शिकवणार आहे.
दरम्यान मालिका सोडल्यावरही रसिका सुनील चांगलीच चर्चेत होती. जीम मधले फोटो पोस्ट करुन कधी फिटनेस गोल दाखवत तर कधी स्वीमिंग पूल मध्ये बिकिनी घालुन, बोल्ड फोटोशुटची झलक शेअर करुन रसिका ऑनलाईन बरीच अॅक्टिव्ह झाली होती.