Taapsee Pannu Wedding: तापसीने बॉयफ्रेंड बॅडमिंटनपटू Mathias Boe सोबत बांधली लग्नगाठ! लवकरच मुंबईत देणार रिसेप्शन पार्टी
Taapsee Pannu, Mathias Boe (PC - Instagram)

Taapsee Pannu Wedding: बॉलिवडू अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) बाबत मोठी बातमी समोर येत आहे. तिने तिचा दीर्घकाळचा प्रियकर आणि बॅडमिंटनपटू मॅथियास बो (Mathias Boe) याच्याशी लग्न केले आहे. वृत्तानुसार, अभिनेत्री आणि माजी ऑलिम्पिक पदक विजेत्याने 23 मार्च रोजी लग्न केले. या सोहळ्याला त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. अहवालात दावा करण्यात आला आहे की, हे लग्न उदयपूरमध्ये झाले. 20 मार्चपासून प्री-वेडिंग फेस्टिव्हल सुरू झाल्याचे वृत्त आहे. या जोडप्याला त्यांचा खास दिवस त्यांच्या जवळच्या लोकांसोबत घालवायचा होता, म्हणून त्यांनी हे लग्न खाजगी पद्धतीने केले. त्यांना या लग्नाकडे मीडियाचे लक्ष नको होते, त्यामुळे त्यांनी त्यांच्या लग्नाची जाहीर घोषणा केली नाही. त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पडला.

तापसीच्या लग्नाला फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. अनुराग कश्यप आणि कनिका धिल्लन हे काही सेलिब्रिटी लग्नाला उपस्थित होते. तिचा 'थप्पड' सह-अभिनेता पावेल गुलाटी याने लग्नाचा एक फोटो शेअर केला, ज्यात अभिनेता अभिलाष थपियाल देखील उपस्थित होता. रिपोर्ट्सनुसार, तापसी लवकरच मुंबईत मित्र आणि सहकाऱ्यांसाठी पार्टी देणार आहे. (हेही वाचा - Anurag Kashyap Instagram Post: "मला भेटायचं असेल तर 15 मिनिटांसाठी एक लाख..."; अनुराग कश्यपची पोस्ट व्हायरल)

 

View this post on Instagram

 

A post shared by Pavail Gulati (@pavailgulati)

लग्नाची एक झलक शेअर करताना पावेल गुलाटीने लिहिले, 'ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, आम्हाला माहित नाही आम्ही कुठे आहोत.' दरम्यान, तापसी पन्नू आणि मथियास बो एक दशकाहून अधिक काळ डेट करत आहेत. त्यांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. काही आठवड्यांपूर्वी ते शीख-ख्रिश्चन फ्यूजन वेडिंग करणार असल्याची बातमी आली होती. 20 मार्चपासून तापसी आणि मथियासचा प्री-वेडिंग उत्सव सुरू झाला आणि 23 मार्चला ते लग्नाच्या बेडित अडकले.