Sooraj Pancholi and Jiah Khan | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणी अभिनेता सूरज पांचोली याची निर्दोश मुक्तता केली आहे. मुंबई सीबीआय कोर्टाने (CBI Court in Mumbai) आज (28 एप्रील) हा निर्णय दिला. अभिनेता सूरज पांचोली (Sooraj Pancholi) याच्यावर जिया खान (Jiah Khan) हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता. दरम्यान, या खटल्याच्या निकालासाठी सूरज पांचोली मुंबई येथील सीबीआय कोर्टात (CBI Court) उपस्थित होता. या वेळी त्याची आई जरीना वहाब (Zarina Wahab) देखील त्याच्यासोबत होत्या. जिया खान ही 3 जून 1013 रोजी तिच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आली होती. तिच्या संशयास्पद मत्यूप्रकरणी सूरज पांचोली याच्यावर आरोप झाले होते.

अभिनेता सूरज पांचोली याच्यावर जिया खान हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. त्याच्यावर मुंबई पोलिसांनी कलम 306 (आत्महत्येला प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे पोलिसांना आढळून आलेल्या सुसाईड नोटच्या आधारे दाखल आहेत. जी जिया खान हिने लिहिल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात सूरज पांचोली याला अटकही करण्यात आली होती.

ट्विट

अभिनेता आदित्य पांचोली आणि जरीना वहाब यांचा मुलगा सूरज पांचोली हा जिया खानसोबत प्रदीर्घ काळ रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात होते. जियाच्या मृत्यूनंतर तिची आई राबिया खान यांनी हत्येचा आरोप केला होता. ऑक्टोबर 2013 मध्ये, राबियाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची विनंती केली होती, तसेच तिच्या मुलीची हत्या झाल्याचा दावा केला होता. (हेही वाचा, Sooraj Pancholi ने इन्स्टाग्राम ला केला अलविदा, स्वत:च्या अकाउंटमधील सर्व पोस्ट केले डिलीट)

ट्विट

व्हिडिओ

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सीबीआयने जुलै 2014 मध्ये महाराष्ट्र पोलिसांकडून तपास हाती घेतला. राबियाने दावा केला की तिची मुलगी सूरज पांचोलीसोबत अपमानास्पद संबंधात होती. सूरज आणि जियाने सप्टेंबर 2012 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली.