Sooraj Pancholi ने इन्स्टाग्राम ला केला अलविदा, स्वत:च्या अकाउंटमधील सर्व पोस्ट केले डिलीट
त्यासाठी त्याने आपल्या इनस्टाग्राम अकाउंटवरील सर्व पोस्ट डिलीट केले आहेत. तसेच आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये 'फिर मिलेंगे इन्स्टाग्राम' असे म्हटले आहे.
सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनाने बॉलिवूडमधील नेपोटिजम, गढूळ झालेले वातावरण, आउटसायडर यासारख्या अनेक मुद्द्यांनी डोकी वर काढली. यामुळे अनेक स्टारकिड्सवर सडकून टिका करण्यात आली. यामध्ये एक नाव पुन्हा एकदा चर्चेत आले ते म्हणजे अभिनेता सूरज पांचोली (Sooraj Pancholi) याचे. सूरजचे नाव सुशांतची दिवंगत माजी मॅनेजर दिशा सालियान (Disha Salian) याच्याशी जोडले गेल्याने तो पुन्हा मिडियासमोर आला. तिच्या आत्महत्येस सूरजला जबाबदार धरण्यात आल्याने सोशल मिडियावर त्याच्यावर प्रचंड टिका करण्यात आली. तसेच ट्रोलही करण्यात आले. या सर्वाला कंटाळून सूरजने इन्स्टाग्राममधून एक्झिट घेण्याचे ठरवले आहे.
त्यासाठी त्याने आपल्या इनस्टाग्राम अकाउंटवरील सर्व पोस्ट डिलीट केले आहेत. तसेच आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये 'फिर मिलेंगे इन्स्टाग्राम' असे म्हटले आहे. Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूतचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी करण्यासाठी सीबीआयची टीम कूपर रुग्णालयात दाखल
पाहा पोस्ट:

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी नेमण्यात आलेल्या सीबीआय चौकशीबाबत सूरजने एका मुलाखतीत म्हटले होते की, "मी खूश आहे की या प्रकरणी आता CBI लक्ष घालतील. यामुळे अफवा पसरवणा-यांचे तोंड बंद होईल. मी सुशांतच्या परिवारासाठी प्रचंड खूश आहे. मला विश्वास आहे, की CBI या प्रकरणी नक्की न्याय करतील."
यापूर्वी सीबीआयची फॉरेन्सिक टीमदेखील मुंबईत दाखल झाली होती. फॉरेन्सिक टीम आपली कारवाई सुरु करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआय टीम कूपर रुग्णालयातील डॉक्टरांची विचारपूस करणार आहे. विशेष म्हणजे ज्या डॉक्टरांनी सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केलं, त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीतून अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 22, 2020 01:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

