Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूतचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी करण्यासाठी सीबीआयची टीम कूपर रुग्णालयात दाखल
Sushant Singh Rajput (Photo Credits: Sachin Tendulkar/Twitter)

Sushant Singh Rajput Case: सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, यापुढे अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयद्वारे करण्यात येणार आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सीबीआय टीमने या प्रकरणाच्या तपासाला सुरूवात केली आहे. दरम्यान, आज सुशांत सिंह राजपूतचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी करण्यासाठी सीबीआयची टीम कूपर रुग्णालयात (Cooper Hospital) दाखल झाली आहे. तसेच दुसरी टीम वांद्रे पोलीस स्थानकात दाखल झाली आहे.

यापूर्वी सीबीआयची फॉरेन्सिक टीमदेखील मुंबईत दाखल झाली होती. फॉरेन्सिक टीम आपली कारवाई सुरु करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआय टीम कूपर रुग्णालयातील डॉक्टरांची विचारपूस करणार आहे. विशेष म्हणजे ज्या डॉक्टरांनी सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केलं, त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीतून अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा - Sushant Singh Rajput: कूपर रुग्णालयात सुशांत चा मृतदेह पाहुन रिया चक्रवर्ती हिने उच्चारले 'हे' शब्द)

दरम्यान, शुक्रवारी सीबीआयने रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकची चौकशी केली होती. सीबीआयची टीम आज सुशांतच्या घरी क्राईम सीन रिक्रिएट करण्यासाठी येणार असल्याची माहिती आहे. याशिवाय या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयने दोन टीम केल्या आहेत. यातील एक पथक वांद्रे पोलीस ठाण्यातून चौकशीसाठी दाखल झाले आहे. या टीमने सुशांतची डायरी आणि इतर दस्तावेज ताब्यात घेतले आहे. तसेच सुशांतचा फोन आणि लॅपटॉपही ताब्यात घेतला आहे.

सुशांतचा मित्र संदिप सिंह याचीदेखील सीबीआय चौकशी करणार आहे. संदिप सिंह हा 14 जूनला पोस्टमार्टेम रुम आणि कूपर रुग्णालयात नितू लिंहसोबत वारंवार गेला होता. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासा होत आहेत.