अभिनेत्री रवीना टंडन हिच्या नावाचे खोटे Twitter Account बनवणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात FIR दाखल
Raveena Tandon Birthday (Photo Credits: File)

अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon)  हिच्या नावाचे खोटे ट्विटर अकाउंट (Twitter Account)  तयार करणाऱ्या अज्ञात व्यक्तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खोट्या ट्विटर अकाउंटवरुन मुंबई पोलीस विभागाचे प्रमुख परमबीर सिंह यांची बदनामी करण्यासंदर्भातील एक पोस्ट करण्यात आली आहे. त्याचसोबत सिंह यांचा असा एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तो एडिटिंग केलेला आहे.(Dharma Productions ने माफी मागावी नाहीतर दंड आकारू; गोवा सरकारचा Karan Johar ला इशारा, जाणून घ्या काय आहे प्रकरण)

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या एका अधिकाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर रवीना टंडन हिच्या नावाचे बनावट अकाउंट बनवले. या आरोपीने मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा एक व्हिडिओ तयार केला. त्याचसोबत अपशब्द वापरुन ती पोस्ट केली आहे. आरोपीने मराठी भाषा आणि मराठी बोलणाऱ्यांचा सुद्धा अपमान केला आहे. या प्रकरणी आयटी अॅक्ट अंतर्गत विविध कायद्यांनुसार गुन्हा दाखल केला गेला आहे. ट्विटरकडून हे अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहे.(Raveena Tandon Birthday: 'टिप टिप बरसा पानी' गाण्याच्या शूटिंगवेळी तापाने फणफणत होती रविना टंडन, तरीही दिले होते सुपरहिट गाणे)

दरम्यान, एका अन्य अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, मुंबई पोलीस आणि राज्य सरकारची बदनामी करण्यासाठी बॉटचा वापर केला गेला आहे. तर बॉट हे असे एक सॉफ्टवेअर आहे ज्याच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या परवानगी शिवाय चालवले जाऊ शकते.