Raveena Tandon Birthday: 'टिप टिप बरसा पानी' गाण्याच्या शूटिंगवेळी तापाने फणफणत होती रविना टंडन, तरीही दिले होते सुपरहिट गाणे
Raveena Tandon Birthday (Photo Credits: File)

Happy Birthday Raveena Tandon: पावसातील रोमँटिक गाण्याला आपल्या हॉटनेसचा तडका मारून एका वेगळ्याच स्तरावर पोहोचवणारी बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन (Raveena Tandon) हिचा आज वाढदिवस. रविनाचा जन्म 26 ऑक्टोबर 1974 मुंबईत झाला. दिसायला सुंदर, देखणी आणि कमनीय बांधा असलेल्या रविनाला कॉलेजच्या दिवसांतच तिला मॉडेलिंगच्या ऑफर्स मिळू लागल्या. त्यामुळे तिने शिक्षण अर्धवट सोडून मॉडेलिंग आणि त्यानंतर अभिनय क्षेत्राकडे वळली. त्यानंतर 1991 मध्ये 'पत्थर के फूल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ज्यासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. मात्र 1994 मध्ये 'मोहरा' (Mohra) चित्रपटातील तिचे गाणे 'टिप टिप बरसा पानी' (Tip Tip Barsa Pani) या गाण्याने ती यशाच्या शिखरावर पोहोचली. हे गाणे आजही लोकांच्या मनात घर करून आहे. त्यामुळे पाऊस आणि हॉट गाणे हे बॉलिवूडमध्ये समीकरणच झाले.

या गाण्याबाबत आणि त्याच्या शूटिंगदरम्यानच्या अनेक रंजक गोष्टी घडल्या. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि रविना टंडन वर पावसात चित्रीत करण्यात आलेल्या या गाण्याच्या शूटिंगवेळी रविना टंडन तापाने फणफणत होती. चित्रीकरणाच्या आदल्या दिवशी तिला ताप आणि सर्दी झाली होती. त्यामुळे सेटवरील सर्वांनाच प्रचंड टेन्शन आले होते. मात्र जेव्हा हे गाणे चित्रीत झाले तेव्हा तेथील क्रू मेंबर्सचाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. कारण तापाने फणफणत असलेल्या रविनाने खूप कमी टेक्स मध्ये हे गाणे शूट केले. त्यानंतर जेव्हा हे गाणे पडद्यावर आले तेव्हा तर या गाण्याने सारे रेकॉर्ड तोडत अक्षरश: धुमाकूळ घातला. या गाण्याने न केवळ रविनाला वेगळी ओळख मिळाली तर तिचा चाहतावर्ग देखील प्रचंड वाढला. Lockdown: बॉलिवुड अभिनेत्री रवीना टंडनने शेअर केला मुलीसोबतचा डान्स व्हिडीओ; Watch Video

या गाण्यानंतर रविना आणि अक्षय कुमारच्या अफेअरच्या चर्चा देखील ब-याच रंगू लागल्या होत्या. या दोघांनी गुपचूप साखरपुडा देखील केला होता असे मिडियामधून बातम्या त्यावेळी पसरल्या होत्या. असो पण हे गाणे आणि अक्षय कुमार आणि रविनाची जबरदस्त केमिस्ट्रीने करोडो लोकांची मने जिंकली. या गाण्यानंतर अनेक अभिनेत्रींवर पावसात गाणी शूट करण्यात आली. मात्र रविनाचे टिप टिप बरसा पानी या गाण्याने एक दर्जा सेट केला होता. त्याची सर आजपर्यंत कोणत्याच गाण्याला आली नाही.

रविना डान्सच्या बाबतीत जितकी अव्वल आहे तितकीच अभिनयातही पारंगत आहे. तिने बिग बी अमिताभ बच्चन, गोविंदा, सलमान खान, आमीर खान सारख्या अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. त्याचबरोबर तिने सत्ता या चित्रपटात मराठी अभिनेता समीर धर्माधिकारी याच्यासोबत प्रमुख भूमिका केली होती.