Swami Om (Photo Credit: Twitter)

Swami Om Dies at 63: 'बिग बॉस' (Bigg Boss) च्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. 'बिग बॉस' हिदीच्या दहाव्या पर्वातील स्पर्धक स्वामी ओम (Swami Om) यांचे आज निधन झाले आहे. त्याच्या मृत्यूच्या बातमीने सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. स्वामी ओम दिर्घकाळापासून आजारी होते. त्याचवेळी सुमारे तीन महिन्यांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. ज्यामुळे त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले व तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, कोरोनाविरोधात लढाई जिंकल्यानंतर त्यांना गेल्या 15 दिवसांपूर्वी अर्धांगवायू झाला. यामुळे त्याच्या शरीराने काम करणे थांबवले होते. त्यानंतर हळूहळू त्याची प्रकृती बिघडू ढासळत गेली आणि आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

झी न्यूजशी बोलताना स्वामी ओमचा मित्र मुकेश जैन यांचा मुलगा अर्जुन जैन यांनी त्यांच्या मृत्यूची बातमी दिली आहे. दरम्यान, अर्जुन जैन म्हणाले की स्वामी ओम यांनी त्यांचे निवासस्थान एनसीआरच्या लोणी येथील डीएलएफ अंकुर विहार येथे आज सकाळी अखेरचा श्वास घेतला आहे. तसेच त्यांच्यावर दिल्लीच्या निगम बोध घाटात अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. हे देखील वाचा- Upcoming Web Series And Movies: फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होणार 'या' वेब सीरिज आणि चित्रपट; पहा संपूर्ण यादी

'बिग बॉस' दहामध्ये स्पर्धक बनून आल्यापासून स्वामी ओम सतत चर्चेत होते. 'बिग बॉस' च्या घरात जवळपास सर्व स्पर्धकांशी त्यांचा जोरदार वाद झाला. इतकेच नाही तर स्वामी ओमचा वादांशीही खोलवर संबंध आहे. 24 ऑगस्ट 2017 रोजी, सर्वोच्च न्यायालयाने गोपनीयतेसारख्या गंभीर विषयावर स्वामी ओम यांना दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.