Amitabh Bachchan to Play King Dasharath in Ramayana: अमिताभ बच्चन पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज , राजा दशरथच्या भूमिकेत दिसणार
Amitabh Bachchan (PC- PTI)

Amitabh Bachchan to Play King Dasharath in Ramayana: हिंदी सिनेसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाले आहेत.मिळालेल्या वृत्तानुसार, अभिनेता अमिताभ बच्चन यावेळी रामायणातील पौराणिक गाथेतील राजा दशरथची महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. प्रख्यात दिग्दर्शक नितेश तिवारी या भव्य प्रकल्पाचे दिग्दर्शन करणार असुन त्यांच्या रामायण या चित्रपटाची वाट प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून आतुरतेने पाहत आहेत.

राजा दशरथच्या भूमिकेत दिसणार अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन हे त्यांच्या गंभीर व्यक्तिमत्त्वासाठी आणि अभिनय कौशल्यासाठी ओळखले जातात. राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न या आपल्या चार मुलांवर खूप प्रेम करणाऱ्या राजा दशरथाची भूमिका उत्तम प्रकारे पार पाडू शकतील. चित्रपटात त्यांचा वडील म्हणून संघर्ष पाहणे रोमांचकारी असेल. चाहते त्यांच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

पाहा पोस्ट 

 

नितेश तिवारी यांचे दिग्दर्शन

नितीश तिवारी हे त्यांच्या दंगल आणि छिछोरे या चित्रपटांसाठी ओळखले जातात, ज्यासाठी  समीक्षकांनी  त्यांचे खूप कौतुक केले. रामायणासारखी पौराणिक कथा पडद्यावर आणण्याचे त्यांचे दिग्दर्शन प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय आहे. नितीश तिवारी हे रामायणाची कथा मोठ्या प्रमाणावर मांडणार आहे. त्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रेक्षणीय सेट डिझाइनचा वापर करण्यात येणार आहे. हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीत एक नवा अध्याय प्रस्थापित करेल, असा दावा या चित्रपटाच्या निर्मात्यांनी केला आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, यश आणि सनी देओलसारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.