Auron Mein Kahan Dum Tha Release Date Postponed: कल्की 2898 AD चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; अजय देवगण आणि तब्बू स्टारर 'ओरो मे कहा दम था'च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली

Auron Mein Kahan Dum Tha Release Date Postponed: अजय देवगण आणि तब्बू यांचा ऑन स्क्रिन रोमांस त्यांच्या चाहत्यांना पाहण्यासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागेल. कारण, औरों में कहाँ दम था (AMKDT) ची रिलीज पुढे ढकलण्यात आली आहे. चित्रपट 5 जुलै रोजी प्रदर्शीत होणार होता. मात्र, आता त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. प्रभास अभिनीत कल्की 2898 AD सध्या यशाच्या शिखरावर आहे. रविवारी चित्रपटाने फक्त भारतात 84 कोटींची कमाई केली होती. चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. चार दिवसांत जगभरात 550 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे 'ओरो मे कहा दम था' चित्रपटाचे नुकसान होऊ नये यासाठी 'ओरो मे कहा दम था' चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलल्याचा अंदाज बांधला जात आहे. (हेही वाचा:'Kalki 2898 AD' Box Office Collection Day 4: बॉक्स ऑफिसवर 'कल्की 2898 एडी' चित्रपटाने गाठला 300 कोटींचा गल्ला, जगभरात कमवले एवढे कोटी)

पोस्ट पहा-