'Kalki 2898 AD' Box Office Collection Day 4: बॉक्स ऑफिसवर 'कल्की 2898 एडी' चित्रपटाने गाठला 300 कोटींचा गल्ला, जगभरात कमवले एवढे कोटी
कल्की 2898 एडी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. विकेंडमुळे प्रेक्षकांनी कल्की चित्रपटाला पसंती दिली आहे. हा चित्रपट गुरुवारी २७ जून रोजी रिलीज झाला होता.
'Kalki 2898 AD' Box Office Collection Day 4: कल्की 2898 एडी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. विकेंडमुळे प्रेक्षकांनी कल्की चित्रपटाला पसंती दिली आहे. हा चित्रपट गुरुवारी 27 जून रोजी रिलीज झाला होता. चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले आहे. माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सायफाय चित्रपट कल्की 2898 एडीने अवघ्या चार दिवसांत 302.4 कोटींचा गल्ला पार केला आहे तर हिंदी भाषेतील चित्रपटाने चार दिवसांत 110.5 कोटींची कमाई केली आहे. चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच प्रेक्षकांना चित्रपटाची उत्सुकता होती. अहवालानुसार, चित्रपटाने जगभरात 500 कोटींची टप्पा ओलांडला आहे. या वर्षात सर्वात जास्त कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. चित्रपटात प्रभास, दिपीका पादूकोण आणि अमिताभ बच्चन यांचा अभिनय प्रेक्षकांना वेड लावत आहे. (हेही वाचा- प्रभासच्या 'कल्की 2898 एडी'ने कमावले 3 दिवसात 415 कोटी
As evening shows started all over the world, #Kalki2898AD has crossed ₹ 500 Crs GBOC at the WW Box office.. 🔥
— Ramesh Bala (@rameshlaus) June 30, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 01, 2024 10:54 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

