Prajakta Mali (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus)  संकटामुळे महाराष्ट्र राज्यात चिंताजनक परिस्थिती उद्भवली आहे, खबरदारीचा पर्याय म्ह्णून नागरिकांना घराबाहेर पडू नका, अधिक लोकांना भेटू नका असे आवाहन करण्यात आले आहे. याच निमित्ताने शाळा- कॉलेजेस, मॉल, सिनेमागृह अशी अनेक ठिकाणी बंद ठेवण्यात आली आहेत. अशावेळी सिनेमा आणि मालिकांच्या शूटिंगला सुद्धा ब्रेक देऊन कलाकरांना घरीच राहण्यास सांगितले जातेय. या सर्व वातावरणात जिथे नियमित आयुष्यामध्ये इतके मोठे प्रभाव पडत आहेत तिथेच या सर्व परिस्थितीसाठी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिने कोरोना व्हायरसचे आभार मानणारी एक पोस्ट केली आहे. कोरोना मुळे ही सुट्टी मिळाली आहे, या आरामाची खरंच गरज होती आता तरी निदान काही दिवस ब्रेक मिळाला आहे. हा वेळ तुमच्या जवळच्या व्यक्तींसाठी वापरा अशा आशयाची पोस्ट प्राजक्ता ने केली आहे. भारतात सुद्धा कोरोनाची लागण व्हावी! KRK चे खळबळजनक ट्विट

प्राजक्ताने पोस्ट साठी घरात आराम करतानाचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्याखाली तिने "दिवस असे की कोणी माझा नाही अन् मी कोणाचा नाही. महाराष्ट्र दौरा आता ब्रेक के बाद. गरज होती आरामाची-आपल्या सर्वांनाच. कुटुंबाला वेळ देण्याची, स्वत:ला वेळ देण्याची, आत्मपरीक्षण करण्याची, आरोग्याला प्राधान्या देण्याची.म्हणून मिळालीये सुट्टी. ती सत्कारणी लावूया. सकस आणि ताजं खा (शक्यतो शाकाहार), व्यायाम करा, ध्यान करा... भिती नको, काळजी घेऊया', असं कॅप्शन दिले आहे.

प्राजक्ता माळी पोस्ट

 

View this post on Instagram

 

दिवस असे की कोणी माझा नाही अन् मी कोणाचा नाही 🎯😛 . Thanks to #corona महाराष्ट्र दौरा आता Break ke Baad 😬 . गरज होती आरामाची-आपल्या सर्वांनाच🎯 . कुटुंबाला वेळ देण्याची, स्वत:ला वेळ देण्याची, आत्मपरीक्षण करण्याची, Health on priority ठेवण्याची. म्हणून मिळालीये सुट्टी. ती सत्कारणी लावूया. सकस आणि ताजं खा (शक्यतो शाकाहार), व्यायाम करा, ध्यान करा... Proffesionals जे advise देताहेत ते पाळा. भिती नको, काळजी घेऊया. And be assured everything will fall in place very soon❤️ . #loveandlight #stayfit #prajaktamali

A post shared by Prajakta Mali (@prajakta_official) on

दरम्यान, प्राजक्ता ही सध्या एका शो साठी महाराष्ट्र दौरा करत असून याअंतर्गत ती विविध ठिकाणी फिरतानाचे अनेक फोटो शेअर करत असते. यासोबतच ती महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमासाठी निवेदन सुद्धा करत आहे. दुसरीकडे राज्यातील कोरोना व्हायरस बद्दल आढावा घयायचा झाल्यास भारतातील सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहेत. साड्या तब्बल ३८ कोरोना रुग्णावर राज्यात उपचार सुरु आहेत तर 300 हुन अधिक संशयित रुग्ण हे देखरेखीखाली आहे.