अजय देवगणच्या चित्रपटात सलमान खान दिसणार 'या' खास भूमिकेत 
फोटो सौजन्य - गुगल

अजय देवगणचा आगामी चित्रपट 'तानाजी द अनसंग वॉरियर'ची सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा जोरदार चालू आहे. तसेच गेल्या वर्षी अजयने या चित्रपटासंबंधित एक ट्विटही केले होते. मात्र या आगामी चित्रपटात सलमना खान ही आपली खास भूमिका बजावणार आहे. परंतु निर्मात्यांकडून सलमानच्या खास भूमिकेबाबत गुपीत ठेवण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी तानाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटातील शिवाजी महारांजी  भूमिका सैफ अली खान करण्याचे सांगण्यात आले होते. मात्र एका मुलाखतीत सैफने महाराजांची भूमिका करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर सैफ राजपूत  योध्दा  उदयनभान राठोड याची भूमिका साकारणार आहे.

अजयचा येणारा हा आगामी चित्रपट प्रेक्षकांसाठी इतिहासाची पाने उलगडणारा ठरेल असं सांगण्यात येत आहे. तर सलमान, अजय देवगण आणि सैफ अली खान योद्धांच्या भूमिकेतून लढताना दिसून येणार आहेत. तसेच हा चित्रपट पुढील वर्षी  22 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे