Triumph Tiger 800 XCA (Photo Credit: Twitter)

ट्रायम्फ मोटारसायकल्सने आपली नवी बाईक ट्रायम्फ टायगर 800 एक्ससीए (Triumph Tiger 800 XCA) भारतात लॉन्च केली आहे. ही बाईक बीएमडब्ल्यू एफ 850 जीएस प्रो रॅलीला टक्कर देईल, असा अंदाज लावण्यात येत आहे. या दमदार बाईकची एक्स शोरुम किंमत 15.16 लाख रुपये आहे. टायगर 800 रेंजमधील हे सर्वात टॉप मॉडेल आहे.

इंजिन

टायगर 800 एक्ससीए मध्ये 800 सीसी, लिक्विड-कूल्ड, 3 सिलिंडर इंजिन देण्यात आले असून हे इंजिन 94 बीएचपी ऊर्जा आणि 79 एनएम टॉर्क जनरेट करते. या बाईकमध्ये 6 गिअर आहेत. यात रोड, ऑफ रोड, ऑफ-रो प्रो, स्पोर्ट आणि ट्रॅक मोडही आहे. तसंच एक मोड रायडरला आपल्या सोयीने वापरण्याची मूभा देण्यात आली आहे.

फिचर्स

या बाईकमध्ये फुल-एलईडी हेडलॅम्प, बॅकलिट स्विचगिअर , सेंटर स्टँड, अॅल्युमिनिअम गार्ड, हिटेड सीट्स आणि हिटेड ग्रीप्स सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. या दमदार बाईकमध्ये 21 इंचाचे फ्रंट व्हिल आणि 17 इंचाचे रिअर व्हिल देण्यात आले आहेत. तर फ्रंटला 305 एमएम ट्विन-डिक्स आणि रिअरमध्ये 255 एमम डिक्स ब्रेक देण्यात आले आहेत. याशिवाय यात क्रूझ कंट्रोल, स्विचेबल एबीएस आणि ट्रॅक्शन कंट्रोल यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत.