Innova HyCross Launched: टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM ) ने आज इनोव्हा हाइक्रॉस (Innova HyCross) या सेल्फ-चार्जिंग स्ट्राँग हायब्रीड इलेक्ट्रिक व्हेइकल (एसएचईव्ही) चे अनावरण करून इनोव्हाच्या प्रवासात एका नव्या युगाची सुरुवात केली. नवीन इनोव्हा हाइक्रॉस टीएनजीए 2.0 लिटर 4-सिलेंडर गॅसोलीन इंजिनसह 5व्या जनरेशनच्या सेल्फ-चार्जिंग स्ट्राँग हायब्रिड इलेक्ट्रिक सिस्टमला सपोर्ट करते. कौटुंबिक गरजांसाठी डिझाइन केलेले, वैशिष्ट्यपूर्ण नवीन इनोव्हा हाइक्रॉस हे प्रत्येक प्रसंगासाठी ग्लॅमर, कणखरपणा, आराम, सुरक्षितता आणि प्रगत तंत्रज्ञान देणारे वाहन आहे. टोयोटाच्या समृद्ध जागतिक एसयूव्ही वारशातून प्रेरणा घेऊन, नवीन इनोव्हा हाइक्रॉस मध्ये भरपूर जागा असलेली मस्क्युलर आणि मजबूत रचना आहे. जी सर्वांना आरामदायी आसन प्रदान करते.
इनोव्हा हाइक्रॉस वाहनाचे बुकिंग जानेवारी 2023 पासून सुरू होईल. टोयोटाची ही एमपीव्ही काही काळापूर्वी इंडोनेशियामध्ये सादर करण्यात आली होती. त्यामुळे या नवीन कारचे सर्व तपशील समोर आले आहेत. या नवीन कारला इनोव्हा क्रिस्टापेक्षा वेगळे इंजिन मिळेल. यासोबतच त्याच्या बाहेरील भागापासून आतील भागातही बरेच बदल करण्यात आले आहेत. या कारमध्ये पॅनोरॅमिक सनरूफसारखे प्रीमियम फीचर्सही देण्यात आले आहेत. (हेही वाचा - Tata Tiago Price Hike: टाटा टियागो 20 हजार रुपयांनी महागली, बेस व्हेरिएंटमध्ये 5 हजारांची वाढ; घ्या जाणून)
इनोवा हाइक्रॉस खास वैशिष्ट्ये -
- टोयोटा हायब्रिड सिस्टीम (टीएचएस) आणि ई-ड्राइव्ह ट्रान्समिशनसह टीएनजीए 2.0-लिटर इंजिनसह येणारे सेल्फ-चार्जिंग स्ट्रॉंग हायब्रिड इलेक्ट्रिक वाहन, एकत्रित कमाल पॉवर आउटपुट 137 kW (186 पीएस) देते.
- गॅसोलीन ग्रेड 128 kW (174 पीएस ) चे आउटपुट देणारे टीएनजीए 2.0 लिटर इंजिनसह येते.
बाह्य वैशिष्ट्ये
- पॅनोरामिक सनरूफ
- गन मेटल फिनिशसह फ्रंट ग्रील
- ऑटो हाय बीमसह स्वयंचलित एलईडी हेडलॅम्प
- ड्युअल फंक्शन डेटाइम रनिंग लाइट (डीआरएल) सह विभागात प्रथम
View this post on Instagram
इनोवा हाइक्रॉसमधील आराम आणि सुविधा -
विभागातील पहिल्या वैशिष्ट्यांमध्ये पॅडल शिफ्ट, पॉवर्ड ऑट्टोमन 2 रा रो सीट्स, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, एअर कंडिशनर (ड्युअल झोन - फ्रंट आणि रिअर झोन), रिअर रिट्रेक्टेबल सनशेड, इलेक्ट्रोक्रोमिक इनर रिअर व्ह्यू मिरर (ईसी आयआरव्हीएम), आणि पॉवर बॅक डोअर (हेही वाचा - Cheapest Electric Car: भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च; पूर्ण चार्ज केल्यावर धावेल 200 किमी, जाणून घ्या किंमत)
View this post on Instagram
इतर प्रमुख वैशिष्ट्ये
- मोठा टीएफटी मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले
- ड्रायव्हर सीट मेमरी आणि स्लाइड रिटर्न आणि अवे फंक्शन
- इनडायरेक्ट ब्ल्यू एम्बिएंट इल्युमिनेशन
इन्फोटेनमेंट सिस्टम
- प्रीमियम, जेबीएल 9 स्पीकरसह कनेक्टेड 25.65 सेमी (10.1) कनेक्ट केलेला डिस्प्ले ऑडिओ
- टोयोटा कनेक्टेड कार तंत्रज्ञान – आय कनेक्ट
इनोवा हाइक्रॉस सुरक्षा वैशिष्ट्ये -
- टोयोटा सेफ्टी सेन्सेटीएम (टीएसएस) ज्यात (डायनॅमिक रडार क्रूझ कंट्रोल, लेन ट्रेस असिस्ट, रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, प्री -कोलिजन सिस्टम, ऑटो हाय बीम) सारख्या सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
- 6 एसआरएस एअरबॅग्ज
- रिअर डिस्क ब्रेक्स
- व्हीकल स्टेबिलिटी कंट्रोल (व्हीएससी) आणि हिल स्टार्ट असिस्ट
- ऑटो होल्डसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक (ईपीबी).
- इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स वितरण (ईबीडी) सह अँटिलॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस )
- डायनॅमिक बॅक गाइडसह पॅनोरामिक व्ह्यू मॉनिटर
टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या केबिनची मोठ्या प्रमाणावर पुनर्रचना करण्यात आली आहे. नवीन फीचर्स आणि पॉवरट्रेनमधील बदलांमुळे इनोव्हा हायक्रॉसची किंमत क्रिस्टलच्या तुलनेत अधिक असण्याची शक्यता आहे.