टाटा मोटर्सने आज आपली बहुप्रतीक्षित एसयूव्ही, हॅरियर बाजारात आणली आहे. या गाडीने एच5एक्स ही संकल्पना ऑटो एक्स्पो 2018 मध्ये प्रदर्शित केल्यापासून सर्वांना आकर्षित केले होते. हॅरियर ही गाडी भारतातील टाटा मोटर्सच्या सर्व अधिकृत विक्री आऊटलेट्समध्ये आजपासून उपलब्ध असेल. हॅरियर ही खऱ्या अर्थाने जगातील एसयूव्ही असून, ती डिझाईन आणि सर्वोत्तमता यांचा सुरेख संगम प्रदान करते. ही एसयूव्ही ऑप्टीमल मोड्यूलर एफिशियंट ग्लोबल अॅडव्हान्स्ड आर्किटेक्चरवर उभारण्यात आली असून ती विविध प्रकारच्या प्रदेशांमध्ये सुलभ ड्रायव्हिंगचा आनंद देते.
हॅरियर ही पहिली गाडी आहे जिने टाटा मोटर्सची इम्पॅक्ट डिझाईन 2.0 डिझाईन भाषा समोर आणली आहे. ती आपल्या ग्राहकांना बाह्यरूप आणि अलिशान आंतररचना यांच्याद्वारे आकर्षित करेल. या उत्पादनाच्या अनावरणाच्या निमित्ताने बोलताना टाटा मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. गंटेर बुटशेक म्हणाले की, ‘2019 च्या सुरुवातीला भारतीय बाजारपेठेत आणण्याचे वाचन आम्ही दिल्ली ऑटो एक्स्पो 2018 मध्ये एस5एक्स ही संकल्पना प्रदर्शित केली. त्याच वचनाचे पालन करून मला आज हॅरियर तुमच्यासमोर सादर करताना आनंद होत आहे. या उत्पादनासोबत, टाटा मोटर्सने प्रीमियम मध्यम आकाराच्या एसयूव्ही विभागात प्रवेश केला आहे.’
या अभूतपूर्व क्षणाच्या निमित्ताने बोलताना, श्री मयंक पारीक म्हणाले की, नवीन हॅरियर ही आमच्या आतापर्यंतच्या सर्वांत महागड्या गाड्यांपैकी एक असून, ती आपले आकर्षक डिझाईन आणि देखण्या कामगिरीद्वारे महत्वाकांक्षी ग्राहकांना नक्कीच आकर्षित करेल.
आकर्षक इॅम्पक्ट डिझाईन 2.0 -
टाटा मोटर्स नवीन इॅम्पक्ट डिझाईन 2.0 लँग्वेजची समकालीन अभिव्यक्ती पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते. यासोबत हॅरियर या गाडीत फ्लोटिंग रुफ बोल्ड क्रोम फिनिशरसोबत, वर आलेले व्हील आर्चेस, ड्युएल फंक्शन एलईडी डीआरएल्स आहेत. त्यामुळे तिचे एकूणच बोल्ड रूप आणखी सुंदर दिसते.
गाडीचे इंटिरियर अत्यंत स्वच्छ, कोणतीही गर्दी नसलेले आहे आणि स्टाइलआणि प्रॅक्टिकल वापर यांचे संतुलन त्यात साधण्यात आले आहे. उच्च दजार्च्या साहित्याचा वापर आणि रंगसंगती यांच्यामुळे जास्त चांगला अनुभव मिळतो आणि त्यामुळे आंतररचना प्रीमियर आणि ऐषारामी दिसते.
हॅरियर ही गाडी चार प्रकारांमध्ये उपलब्ध असेल- एक्सई, एक्सएम, एक्सटी, एक्सझेड आणि त्यात पाच आकषर्क रंग आहेत- कॅलिस्टो कॉपर, थर्मिस्तो गोल्ड, एरियल सिल्व्हर, टेलेस्टो ग्रे आणि ऑर्कस व्हाइट.
लँड रोव्हरच्या आकषर्क डी 8 व्यासपिठापासून आलेली आणि भारतीय परिस्थितीसाठी 2.2 दशलक्ष किमी अत्यंत दुगर्म वातावरणासाठी बनवण्यात आलेली ही गाडी आकषर्क ड्रायव्हिंग डायनॅमिक्स, संपूर्ण सुरक्षा आणि एक नवीन इन केबिन अनुभव देते. हॅरियर 90 टक्के ऑटोमेटेड बीआयडब्ल्यूवर बांधणी केलेली असेल आणि पुण्यातील नवीन असेंब्ली लाइनवर उत्तम दर्जा कायम राखून बनवली जाईल.
उत्तम कामगिरीची रचना -
हॅरियरमध्ये अद्ययावत क्रायोटेक 2.0 डिझेल इंजिन आहे. त्यामुळे पॉवर आणि इंधन यांच्यामध्ये चांगले संतुलन राखले जाते. तिला 6-स्पीड मॅन्युएल ट्रान्समिशनशी उत्तमरित्या जोडण्यात आले आहे. क्रायोटेक इंजिनातून 140 पीएस पॉवर आणि 350 एनएम टॉर्क अद्ययावत इलेक्ट्रोनिक पद्धतीने नियंत्रित व्हेरिएबल जिओमेट्री टर्बोचार्जर (ईव्हीजीटी) सोबत मिळतो.
मल्टी ड्राईव्ह मोड 2.0 इंजिन ड्राईव्ह मोड्स (इको, सिटी, स्पोर्ट) आणि ईएसपी टेरेन रिस्पॉन्स मोड्स (नॉमर्ल, रफ, वेट) यांच्यामुळे कोणत्याही प्रकारच्या प्रदेशात आपल्याला चांगली हाताळणी आणि उत्तम ड्राईव्हिंग डायनॅमिक्ससाठी स्टिअरिंग मिळते.
हॅरियरचे पुढील आणि मागील सस्पेन्शन विशेषतः भारतीय परिस्थितीसाठी तयार करण्यात आले असून आपल्याला चांगल्या हाताळणीसह उत्तम राइड मिळते. फ्रंट सस्पेशन आणि हायड्रा बुश डी8 व्यासपिठातून घेण्यात आले आहे, आणि रेअर ट्विस्ट ब्लेड सस्पेन्शनची रचना लोटस इंजिनीअरिंग युकेने कली आहे.
वैशिष्ट्ये –
फ्लोिटग आयलँड टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम 8.8 इंची हाय रेझोल्यूशन डिस्प्लेसह येत असून अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार प्ले, कनेक्टनेक्स्ट अॅप सूट (ड्राईव्ह नेक्स्ट, टाटा स्मार्ट रिमोट, टाटा स्माटर् मॅन्युअल), व्हिडिओ आणि इमेज प्लेबॅक, व्हॉइस रिकगिनशन अँड एसएमएस रिडआऊट, व्हॉइस एलटर्स आणि इतर अनेक गोष्टींच्या माध्यमातून उत्तम इन कार कनेक्टिव्हिटी आणि इन्फोटेमेंट देते. एक 320 डब्ल्यू आरएमएस जेबीएल ऑडिओ सिस्टीम 9 स्पीकर्ससोबत (4 स्पीकर्स + 4 ट्वीटर्स + 1 सबवूफर) असून ती एक चांगला ऑडिओ अनुभव देते. हॅरियरमध्ये मिडिया, फोन आणि नेव्हिगेशन माहिती यांचे संतुलन साधण्यात आले असून, त्यात 7 इंची कलर्ड टीएफटी डिस्प्ले इन्स्ट्रुमेन्ट् क्लस्टरही आहे.