ऑटोमोबाईल उद्योग (Automobile Sector) जस जसे जगात विकसित होत आहे, तस तसे आता कार उत्पादक इलेक्ट्रिक वाहनाकडे (Electric Car) अधिक लक्ष देत आहेत. परंतु इलेक्ट्रिक वाहनमध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे त्याची किंमत. हीच गोष्ट लक्षात घेऊन कार उत्पादक कमी किंमतीत कार बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत. म्हणूनच, चिनी कार निर्माता कंपनी ग्रेट वॉल मोटर्स (Great Wall Motors) जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, भारतात दाखल करणार आहे.
या कारचे नाव ओरा आर 1 (Ora R1), असून या कारची किंमत 6.2 ते 8 लाख रुपयांदरम्यान असू शकते. ही कार एकदा चार्ज केल्यावर 351 किमी पर्यंत जाऊ शकते आणि त्यामध्ये 35 वॅटची मोटर असेल.
आतापर्यंत बाजारात आलेल्या इतर कारशी तुलना केली असता, त्यांची सरासरी श्रेणी 270 किलोमीटर असल्याचे आढळले. आतापर्यंत भारतात दाखल करण्यात आलेल्या गाड्यांची सर्वाधिक श्रेणी ह्युंदाई कोना ही आहे, जी एका वेळेच्या पूर्ण चार्जमध्ये 452 किमी धावते, मात्र तिची किंमत 28 लाख रुपये आहे. भारतात इलेक्ट्रिक कारची सरासरी किंमत 13 लाख रुपये आहे, जे बर्यापैकी जास्त आहे. डिझेल पेट्रोलवर चालणाऱ्या कारची सरासरी किंमत 5 लाख रुपये आहे. म्हणून यावेळी ही इलेक्ट्रिक कार अधिक चांगली असल्याचे सिद्ध होऊ शकते, विशेषत: बीएस -6 बद्दल वादविवाद चालू असताना ही गाडी बाजारात दाखल होत आहे. (हेही वाचा: जानेवारी 2020 मध्ये बाजारात येणार या नव्या Cars; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये)
ओरा आर 1 मध्ये 35KW ची इलेक्ट्रिक मोटर आणि 33 किलोवॅटची लिथियम आयन बॅटरी आहे. ही गाडी पूर्ण चार्ज होण्यास सुमारे 10 तासांचा कालावधी लागेल. फस्ट चार्जरसह, 40 मिनिटांत त्याची बॅटरी 20% ते 80% पर्यंत वाढेल. या इलेक्ट्रिक कारमध्ये टेस्ला ऑटोपायलट किंवा त्यासारख्या काही फॅन्सी तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये नाहीत, परंतु लुकच्या दृष्टीने ही कार खास आहे. स्टीलच्या फ्रेमवरील कारचे कर्व्हज आणि मोठे-गोल हेडलॅम्प्स त्याला रेट्रो मॉडर्न लुक देतात.