सिंगल चार्जमध्ये 160 किलोमीटरची जबरदस्त रेंज देणार Rugged इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या किंमत
Rugged Electric Scooter (Photo Credits-Twitter)

भारतीय कंपनी eBikeGo ने बुधवारी मार्केटमध्ये G1 आणि G1+ वेरियंट रग्ड इलेक्ट्रिक स्कूटर (Rugged Electric Scooter) लॉन्च केली आहे. ज्याची सुरुवाती किंमत 79,999 रुपये आहे. यामध्ये G1+ ची किंमत 89,999 रुपये ठेवण्यात आली आहे. दोन्ही किंमतीमध्ये FAME II सब्सिडीचा समावेश आहे. दरम्यान, राज्य स्तरीय सब्सिडी लाकू करण्यानंतर किंमतीत अधिक घट होणार आहे. भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची वाढती मागणी पाहता कंपनीने हे नवे मॉडेल्स लॉन्च केले आहे. ज्याची किंमत भारतीय ग्राहकांच्या अनुरुप ठेवण्यात आली आहे.(Yamaha MT-15 चे नवे MotoGP Edition लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स)

रग्ड इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये दोन 2kWh ची बॅटरी लावण्यात आली आहे. जी अगदी सहज बदली केली जाऊ शकते. eBikeGo ने दावा केला आहे की, बॅटरी 3.5 तासात चार्ज केली जाऊ शकते. याची रेंज जवळजवळ 160 किलोमीटर आहे. यामध्ये एक 3kWh ची मोटर लावण्यात आली आहे. जी इलेक्ट्रिक स्कूटरला 70 किमी प्रति तास टॉप स्पीड हिट करण्यास मदत करणार आहे.

या स्कूटरमध्ये ग्राहकांना 30 लीटर स्टोरेजची क्षमता दिली आहे. ज्यामध्ये गरजेहून अधिक सामान ठेवता येणार आहे. त्याचसोबत इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये एक अँन्टी थेफ्ट फिचर सुद्धा मिळणार आहे. ई-स्कूटरला रिमोटच्या मदतीने अनलॉक करण्यासह चालवण्यासाठी रग्ड अॅपचा वापर केला जाऊ शकतो. रग्ड इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंनपनीने 12 सेंसर दिले आहेत.(Honda Launch CB200X: होंडाची CB200X बाईक भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध, पहा किंमत आणि वैशिष्ट्ये)

भारतात डिझाइन आणि निर्मित करण्यात आलेल्या रग्ड इलेक्ट्रिक स्कूटर संबंधित कंपनीने दावा केला आहे की, याच्या नावाप्रमाणे देशातील आव्हानात्मक रस्त्यांवरुन चालवण्यासाठी तयार केली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची निर्मिती कोयंबटूर मध्ये केली आहे.