Yamaha MT-15 MotoGP Edition (Photo Credits-Twitter)

जपानची दुचाकी वाहन निर्माती कंपनी यामाहाने आज भारतात आपली प्रसिद्ध MT-15 मॉन्स्टर एनर्जीचे नवे मोटीजीपी एडिशन लॉन्च केले आहे. याची एक्स शो रुम किंमत 1.48 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने या बाइकला अत्यंत आकर्षक लूक देण्याचा प्रयत्न केला आहे. बाइकचे नवे एडिशन याच्या रेग्यूलर मॉडेल MT-15 च्या तुलनेत जवळजवळ 1400 रुपये महागडी आहे. ज्याची किंमत 1,45,600 रुपये आहे. इच्छुक ग्राहकांना 2 रुपये देऊन ही बाइक बुक करता येणार आहे.(Tata Motors ने टीझर लॉन्च झळकवली आपली एसयुवी HBX)

Yamaha MT 15 MotoGP एडिशनचे फ्यूल टँक एक्सटेंशनवर सिग्नेचर मॉन्स्टर एनर्जी ग्राफिक्ससह उतरवली आहे. MotoGp ब्रानिंगच्या फ्यूल टँक श्राउड्स, साइड पॅनल्स आणि फ्यूल टँकवर जोडले जातात. तर यामाहा लोगो हा सोनेरी रंगात दिला आहे. या बदलाव्यतिरिक्त मोटरसायकल स्टँडर्ड बाइक समान दिसते. मोटरसायकलमध्ये एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि द्विन एलईडी डीआरएल आहे. नवे वेरियंट मॉन्स्टर एनर्जी मोटोजीपी एडिशन ग्राफिक्ससह सिंगल ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

मोटरसायकलमध्ये सिंगल चॅनल ABS सिस्टिमसह फ्रंट आणि रियर हायड्रोलिक सिंगल डिस्क ब्रेक दिला आहे. रिपोर्ट्सनुसार कंपनी MT-15 मध्ये डुअल चॅनल abs सिस्टिम उतरण्याची योजना करत आहे. बाइकच्या सस्पेंशन सेटअपमध्ये टेलिस्कोपिक फोर्क्स अपफ्रंट आणि स्विंगराम रियर युनिटचा समावेश आहे. हे साइड स्टँडे इंजिन कट ऑफ स्विच, रेडियल टायर, ऑल-डिजिटल एलसीडी इंस्ट्रुमेंट कंसोल आणि एलईडी टेल-लॅम्प आणि टर्न इंडिकेटर्स सारख्या फिचर्स लैस आहे.(Upcoming Cars: रेनॉल्टची 'ही' कार खरेदी करण्याची उत्तम संंधी, मिळतेय 70 हजारांपर्यंत सूट)

Yamaha MT 15, Deltabox फ्रेमवर आधारित जे R15 V3.0 मध्ये पाहता येणार आहे. कंपनीने आधीच R15 वर्जन 4.0 वर काम करण्यास सुरु केली आहे. जी भारतासह इंडोनेशिया मध्ये काही वेळा टेस्टिंग दरम्यान दिसली आहे. MT15 MotoGP एडिशनला पॉवर देण्यासाठी BS6 स्टँडर्ड 155cc, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिनसह उतरवली आहे. मोटार 18.3bhp ची अधिकतम पॉवर आणि 14.1Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे, ती 6 स्पीड गिअरबॉक्स आणि स्लिपर आणि असिस्ट क्लचसह जोडली आहे.