Upcoming CNG Cars : नवीन कार घेण्याच्या विचारात आहात ? तर ही बातमी वाचाच
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Truebil)

दिवसेंदिवस इंधनाचे दर गगनाला भिडत आहेत. मात्र याचा परिणाम नवीन गाडी विक्री होत नाही आहे. चारचाकी गाड्यांच्या कंपन्या फायद्यात जात आहे. इंधनाचे दर वाढल्याने या कंपन्यांनी सीएमजीवर चालण्याऱ्या गाड्या बनवण्यामध्ये भर दिला आहे. तशीच या गाड्यांना ग्राहकांची पसंतीही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे अनेक मोठ्या कंपन्या सीएनजी (CNG Cars) गाड्या बाजारात आणत आहेत. सीएनजीवर चालणार्‍या कार पेट्रोल-डिझेलपेक्षा (Petrol - diesel) अधिक किफायतशीर असतात. त्यामुळे मारुती(Maruti Suzuki), टाटा मोटर्स(Tata Motors) आता सीएनजी कार बनण्यावर आपले लक्ष केंद्रित करीत आहेत. पुढील काही महिन्यांत कोणत्या सीएनजी मोटारी (CNG Cars) बाजारात आणल्या जाणार आहे. यातील काही गाड्यांची यादी आम्ही तुमच्यासाठी केली आहे. जर तुम्ही यावर्षी गाडी घेण्याच्या विचारात असाल तर यातील एक गाडी तुमच्या पसंतीस नक्कीच पडेल.

नक्की कोणत्या नवीन गाड्या येणार बाजारात  ?

1. मारुती सुझुकी डिजायर सीएनजी

मारुती सुझुकीच्या सीएनजी गाड्यांना आधीच बाजारात मोठी मागणी आहे. आता कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये आणखी एक प्रसिद्ध कार डिजायर जोडणार आहे. कॉम्पॅक्ट सेडान कार द डिजायर ही एक अतिशय उत्तम कार आहे. कंपनी सणासुदीच्या काळात मारुती ही कार बाजारात आणणार असलल्याची चर्चा आहे. कारण सणासुदीच्या काळात गाडी खरेदी विक्रीला मोठी मागणी असते. त्यामुळे जोरदार विक्रीचा फायदा कंपनीला मिळू शकतो. नुकतीच डिजायरची चाचणीही पाहायला मिळाली आहे. या मारुती डिजायरची किंमत खूप कमी असेल असे कंपनीचे म्हणणे आहे.

2. नवीन मारुती सुझुकी सेलेरिओ सीएनजी

मारुती यावर्षी आपल्या सेलेरिओ सीएनजीचे पुढील जनरेशन मॉडेलदेखील बाजारात आणू शकते. त्याची बरीच वैशिष्ट्ये सध्याच्या सेलेरिओप्रमाणेच असतील. असे म्हटले जात आहे की त्याचे मायलेज काही प्रमाणात जास्त असू शकते. सध्याची सेलेरिओ कार 31 किमी मायलेज देते. किंमतींमध्ये फारसा फरक दिसून येणार नाही. सध्याचा मॉडेलपेक्षा नवीन गाडीची रचना थोडी वेगळी असल्याचे समजले आहे.

3. टाटा टियागो सीएनजी

मारुतीनंतर टाटा मोटर्सही यावर्षी भारतात आपली सीएनजी कार बाजारात आणणार आहे. टाटा मोटर्स टियगोची सीएनजी आवृत्ती बाजारात आणणार असून ती नुकतीच एआरएआय चाचणी दरम्यान आढळली आहे. टाटा टियागो सीएनजी ही एक अतिशय परवडणारी कार असेल अशी अपेक्षा आहे. यामध्ये पॉवर प्लांट 1.2L रेवोट्रॉन इंजिन असेल. टाटा मोटर्स याव्यतिरिक्त सीएनजीमध्ये अल्ट्रोज आणि नेक्सन देखील बाजारात आणणार आहे.

4. टाटा टिगोर सीएनजी

टियागो व्यतिरिक्त टाटा मोटर्स टिगोरची सीएनजी कार आणणार आहे. पेट्रोलपेक्षा सीएनजी अधिक किफायतशीर होईल. यंदाच्या सणासुदीच्या काळात ही कार बाजारात आणण्याचा विचार कंपनी करत आहे.

5. फोर्ड एस्पिर सीएनजी 

फोर्डचे एस्पिर सीएनजी एक मजबूत उत्पादन असू शकते. कारण ह्युंदाई ऑरा ही  सीएनजी किट घेऊन आलेली कार आहे. यापूर्वी फोर्डने भारतीय बाजारात एस्पिर सीएनजी विकली होती पण नंतर बंद केली. मात्र आता फोर्ड एस्पिर सीएनजी ची टेस्टिंग नुकतीच करण्यात आली आहे. ही कार लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे.