MG Motors कंपनी येत्या 8 फेब्रुवारीला भारतात लाँच करणार MG ZS EV 2021, काय असतील याची खास वैशिष्ट्ये
MG Motors (Photo Credits: Facebook)

सध्या कार्सच्या दुनियेत धुमाकूळ घालत असलेली कंपनी MG Motors ने आपल्या चाहत्यांसाठी आणखी एक धमाकेदार कार घेऊन येत आहे. येत्या 8 फेब्रुवारीला भारतात MG ZS EV 2021 भारतात लाँच होणार आहे. MG Hectors ने भारतीय बाजारात धुमाकूळ घातल्यानंतर आता ही नवी कार ग्राहकांच्या भेटीला येत आहे. या कार विषयी अजूनपर्यंत कोणती अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र या कारमध्ये अपडेटेड इंटीरियर आणि एक्स्टीरियर असू शकते असे सांगण्यात येत आहे. यात अनेक बदल करण्यात आले आहे.

कंपनीच्या युके मॉडलमध्ये हेक्सागॉनल फ्रंट ग्रिल दिले गेले आहेत. त्याशिवाय यात नवे बंपर, LED हेडलाइट लॅम्प्स आणि इंटिग्रेटेड LED DRLs दिले गेले आहेत. त्याचबरोबर या कारमध्ये नवे स्टायलिंगसह अलॉय वील्ज दिले गेले आहेत.हेदेखील वाचा- भारतात नुकतेच लॉंंच झालेली MG Hector ने महिन्याभरात दुसऱ्यांदा घेतला पेट; कंपनीकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही (Video)

या कारला 5 प्रकारे चार्ज केले जाऊ शकते. यासाठी ग्राहकांना ऑनबोर्ड चार्जिंग केबल, AC फास्ट चार्जर, डीलरशिप्स वर 50kw DC सुपर फास्ट चार्जर, एक्सटेंडेड आणि चार्ज ऑन द गो सारखे पर्याय असू शकतात.

ZS EV मध्ये 44.5kWh बॅटरी पॅक आहे. त्यामुळे एकदा ही बॅटरी चार्ज केल्यास इलेक्ट्रिक एसयूव्ही 340 किमी पर्यंत चालेल. यात लिथियम-आर्यन बॅटरीला 50kW DC चार्जरने 40 मिनिटांत 80% चार्ज होऊ शकते. याचा स्टँडर्ड 7.4 kW चार्जरने चार्ज केल्यानंतर ही कार 7 तास चालू शकते. ही कार 8 सेकंदात 0-100 किमी प्रति तास इतका स्पीड पकडू शकते.

अलीकडेच MG ने भारतात गेल्या दिवसात भारतात आपली पॉप्युलर एसयुवी एमजी हेक्टरचे फेसलिफ्ट वर्जन लॉन्च केले आहे. इंडियन मार्केटमध्ये यासाठी Hyundai Creta ला मोठी टक्कर देऊ शकते. एमजी हेक्टर ची लोकप्रियता लक्षात घेता कंपनीने याच्या फेसलिफ्ट वर्जनचे मॉडेल नुकतेच लॉन्च केले होते. कारच्या एक्सटीरियरबद्दल बोलायचे झाल्यास नव्या Hector मध्ये नवी फ्रंट ग्रिलवर क्रोम टिप्स दिले गेले आहे. जे या दमदार एसयुवीला शार्प अपिअयरंन्स देणार आहे. यामध्ये बदलण्यात आलेले अलॉय व्हिल्स सुद्धा पहायला मिळणार आहेत.