जावा बाईक्स (Photo Credits: Twitter)

Jawa Motorcycles outlets in Pune : भारतामध्ये पुनरागमनासाठी सज्ज असलेल्या जावा (Jawa Motorcycles )बाईक्स देशभरामध्ये 105 डिलर्सकडे उपलब्ध होणार आहे. त्यापैकी पहिली दोन डिलर्स शोरूम पुण्यामध्ये सुरू करण्यात आली आहेत. बाणेर आणि चिंचडवडमध्ये जावा मोटारसायकलची शोरूम सुरू झाली आहेत. सध्या जावा (Jawa ), जावा 42 ( Jawa 42) आणि जावा पेराक (Jawa Perak)अशा तीन बाईक्स भारतात लॉन्च केल्या आहेत. त्याची विक्री आणि टेस्ट राईड सुरू करण्यात आली आहे.

5000 रूपयांमध्ये जावा बाईक्सचं बुकिंग सुरू करण्यात आलं आहे. मार्च महिन्यामध्ये जावा मोटारसायकल ग्राहकांना मिळेल तर जानेवारीमध्ये गाडीच्या उत्पादनाला सुरूवात होणार आहे.

भारतामध्ये मध्यप्रदेशातील इंदौर नजीक असणार्‍या पीथमपूर भागामध्ये महिंद्रा मॅन्युफॅक्चरिंग फॅसिटिलीद्वारा जावा बाईक्सची निर्मिती केली जाणार आहे. Jawa, Jawa42 अपडेट: नववर्षात नव्या सेफ्टी फिचर्ससह होणार सादर, किंमत वाढण्याची शक्यता

बाईक्सच्या किंमती:

दी जावा – 1.64 लाख रु. (एक्स शोरुम दिल्ली)

जावा 42 – 1.55 लाख रु. (एक्स शोरुम दिल्ली)

जावा पेराक – 1.89 लाख रु. (एक्स शोरुम दिल्ली)

देशभरात एकूण 105 डिलर्सकडे ही मोटरसायकल विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे, तसंच डिसेंबरपर्यंत अजून 64 डिलर्सकडे ही मोटरसायकल विक्रीसाठी आणि टेस्ट राईडसाठी उपलब्ध होईल. ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही स्वरूपात बाईकचं बुकिंग करण्याची सोय ग्राहकांना देण्यात आली आहे.