Jawa, Jawa42 अपडेट: नववर्षात नव्या सेफ्टी फिचर्ससह होणार सादर, किंमत वाढण्याची शक्यता
Jawa42 | (Photo courtesy: archived, edited, representative image)

बाईकप्रेमींचे आकर्षण असणारी Jawa Motorcycles ची नवी बाईक Jawa आणि Jawa 42 लवकरच आपल्या नव्या रुपात झळकणार आहे. या मॉडेलमध्ये लवकरच अनेक मॉडर्न फीचर्स समाविष्ठ केले जाणार आहेत. लेटेस्ट फीचर्स अपडेटसह कंपनीने या बाइक काही मार्केटमध्ये उतरवल्याचेही समजते. या बाईक्समध्ये ABS फिचर्सची कमी असल्याची अनेक चाहत्यांची तक्रार होती. मात्र, लवकरच ही कमी भरून काढत कंपनी या बाईक्स ग्राहकांच्या भेटीला घेऊन येत आहे.

जावा आणि जावा 42 च्या फ्रंटला 280mm डिस्क ब्रेक आणि रिअरमध्ये 153mm ड्रम ब्रेक सेटअप आहे. यात सिंगल चॅनल एबीएस देण्यात आले आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्राहक आणि बाईक चाहत्यांकडून मिळालेल्या फीडबॅकनंतर कंपनी या दोन्ही बाइकच्या रिअरमध्ये एबीएससोबत डिस्क ब्रेक देत आहे. सांगितले जात आहे की, जावा मोटरसाइकल 2019मध्ये या दोन्ही बाईक ड्यूल चॅनल एबीएससोबत लॉन्च करणार आहे. (हेही वाचा, नवीन Bike घेत आहात? 'या' आहेत 50 हजारापेक्षा कमी किंमतीच्या जबरदस्त बाईक)

या बाईकच्या किमतीची चर्चा करायची तर, ड्यूल डिस्क आणि ड्यूल एबीएसोसबत दोन्ही बाईक्सची किंमत 10 ते 15 हजार रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. या बाइक्सची किंमत वाढली तर, ती थेट रॉयल एन्फील्डसोबत स्पर्धा करेन. मुंबईतील एका शोरुममध्ये सांगितल्या जाणाऱ्या किमतीनुसार रॉयल एन्फील्ड क्लासिक 350 सिग्नल्स एडिशनची किंमत 1.62 रुपये इतकी आहे.

पॉवर फिचर्स

जावा आणि जावा 42मध्ये 293 सीसीचे लिक्विड कूल्ड सिंगल सिलिंडर इंजिन आहे. हे इंजिन 27hpची पॉवर आणि 28 एनएम टॉर्क जनरेट करते. इंजिनला 6-स्पीड ट्रान्समिशनयुक्त करण्यात आले आहे. कंपनीचा दावा आहे की, इंजिन BS VI मानांकीत आहे.