Hyundai Creta भारतात सर्वाधिक विक्री केली जाणारी कॉम्पॅक्ट SUV चा समावेश आहे. भारतात 2015 मध्ये ही लॉन्च केली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत ग्राहकांना पसंद पडत आहे. पण 2020 मध्ये या एसयुवीच्या नेक्स्ट जनरेशन मॉडेल भारतात लॉन्च केली होती. मात्र आता कंपनीने या एसयुवीच्या डिजिटल E वेरियंटला वेबसाइटवरुन हटवले आहे.(Suzuki Gixxer 250 सीरिज मधील बाइकच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या अधिक)
2020 मध्ये जेव्हा नवी Creta लॉन्च केली होती तेव्हा E,EX,S,SX आणि SX(O) वेरियंटमध्ये उपलब्ध करुन दिली होती. पण आत कंपनीने डिझेल E वेरियंटला वेबसाइटवरुन हटवले आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर फक्त पेट्रोल E वेरियंट उपलब्ध आहे. ती ग्राहकांना 999,9990 रुपयांना खरेदी करता येणार आहे.(Elon Musk ला मोठा झटका; Tesla च्या गाड्यांमध्ये आढळल्या त्रुटी, 1,58,000 गाड्या परत मागवण्याचे आदेश)
कारच्या इंजिन आणि पॉवर बद्दल बोलायचे झाल्यास 2020 मध्ये ती 3 इंजिन ऑप्शनमध्ये लॉन्च केली होती. ज्यामध्ये 1.5 लीटर पेट्रोल, 1.4 लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लीटर डिझेलचा समावेश आहे.या सर्व इंजिनसह 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स स्टँडर्ड रुप दिले गेले आहे. तर क्रेटासह 6 स्पीड ऑटोमॅटिक आणि 7 स्पीड डीसीटी गिअरबॉक्स सुद्धा ऑप्शन दिला गेला आहे. फिचर्स मध्ये पॉवर अॅडजेस्टेबल ड्राइव्हर सीट आणि वेंटिलेटिड फ्रंट सीट, कनेक्टेड कार तंत्रज्ञानासह 7 इंचाचा सेमी डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर आणि 10.25 इंचाचा टचस्क्रिन इंन्फोटेनमेंट सिस्टिम ही दिला आहे. सेफ्टी फिचर्स बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 6 एअरबॅग्स, EBD आणि ABS आणि रियर पार्किंग सेंसरचा समावेश आहे.