Suzuki Gixxer 250 सीरिज मधील बाइकच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या अधिक
Maruti Suzuki (Photo Credits-Twitter)

सुजुकी (Suzuki) मोटरसायकल इंडियाने आपली Gixxer 250 आणि Gixxer SF 250 च्या भारतीय किंमतीत वाढ केली आहे. कंपनीने आपल्या या मोटरसायकलच्या किंमती 2073 रुपयांनी वाढवल्या आहे. Suzuki Gixxer 250 ची आता दिल्लीत एक्स शो रुम किंमत 1,67,700 रुपये झाली आहे. तर याच्या Gixxer SF 250 ची किंमत 178,400 रुपये झाली आहे. बाइकच्या किंमती वाढण्याव्यतिरिक्त कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याच्या इंजिन स्पेसिफिकेशन आणि फिचर्स आधीसारखेच आहेत.(नवी Suzuki Hayabusa च्या लॉन्चिंगपूर्वी फोटो इंटरनेटवर लीक, भारतातील नागरिकांकडून केली जातेय प्रतिक्षा)

Suzuki Gixxer SF 250 च्या पॉवर परफॉर्मेस बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये249 सीसी, 4 स्ट्रोक, सिंगल सिलिंडर, 4 वॉल्व, फ्यूल इंजेक्टड इंजिन दिला आहे. याचा इंजिन 9000 आरपीएमवर 26.5PS ची मॅक्सिमम पॉवर आण 7500 आरपीएमवर 22.6Nm चा पीक टॉर्क जनेरट करणार आहे. यामध्ये सुजुकी ऑयल कूलिंग सिस्टम तंत्रज्ञान दिले गेले आहे.याचा इंजिन 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्स लैस आहे.(Mahindra ते Tata कंपनीच्या स्वस्त इलेक्ट्रिक कार लवकरत होणार लॉन्च, फुल चार्जिंग मध्ये देणार जबरदस्त रेंज)

सुजुकी गिक्सरची लांबी 2010 मिलीमीटर, रुंदी 740 मिलीमीटर आणि उंची 1035 मिलीमीटर आहे. याचा व्हेईकल बेस 1345 मिलीमीटर आणि ग्राउंट क्लिअरेंस 165 मिलीमीटर आहे. या व्यतिरिक्त याच्या सीटची उंची 800 मिलीमीटर आहे. बाइकमध्ये सुरक्षिततेसाठी डुअल चॅनल एन्टी लॉक ब्रेकिंग सिस्टिम (ABS) दिले आहे. तसेच स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाल्यास याच्या फ्रंटला क्वाइल स्प्रिंग, ऑयल डॅम्प्ड टेलिस्कोपिक फॉर्क्स दिले आहे. याच्या रियरमध्ये स्विंग आर्म टाइम मोनो सस्पेंशन दिले आहे.