Mahindra ते Tata कंपनीच्या स्वस्त इलेक्ट्रिक कार लवकरत होणार लॉन्च, फुल चार्जिंग मध्ये देणार जबरदस्त रेंज
Electric Vehicle. Representational image. (Photo Credits: GeoMarketing)

नवे वर्ष हे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी अत्यंत खास आहे. कारण या वर्षात पेट्रोल इंजिन कारसह कार निर्माता कंपन्या आपले लक्ष खिशाला परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कारकडे देत आहे.  अशातच टाटा मोटर्स ते महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनी आपल्या बजेट इलेक्ट्रिक कार या वर्षात लॉन्च करणार आहे. भारतात कार मार्केट मध्ये आधीपासूनच काही इलेक्ट्रिक कार उपलब्ध करुन दिल्या आहेत. परंतु त्याच्या किंमती  थोड्या अधिक आहेत.  त्यामुळे लोक महागडी गाडी विकत घेण्यापूर्वी विचार करत आहेत. हिच गोष्ट लक्षात घेता ऑटोमोबाईल कंपन्या इलेक्ट्रिक कारच्या किंमती या सामान्य कार सारखीच ठेवण्याचा विचार करत आहेत. तर जाणून घ्या टाटा आणि महिंद्रा कंपनी कोणत्या स्वस्त इलेक्ट्रिक कार भारतात यंदाच्या वर्षात लॉन्च करु शकतात.(Tata ने लॉन्च केला नव्या सफारीचा टीझर, लवकरच बाजारात उतरवली जाणार ही आयकॉनिक एसयुवी)

भारतीय कार निर्माता कंपनी Mahindra लवकरच आपली पॉवरफुल एन्ट्री लेव्हल कार महिंद्रा केयुवी 100 चे इलेक्ट्रिक मॉडेल घेऊन येणार आहे. खरंतर कंपनीने ही कार इलेक्ट्रिक रुपात लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे.  कारण ही एक एन्ट्री लेव्हल एसयुवी असून ती कमी किंमतीत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ग्राहक सु्द्धा खरेदी करण्यास आपली पसंदी दर्शवतील. कंपनी लवकरच याच्या लॉन्चिंग बद्दल घोषणा करु शकते. ही कार 2020 मध्ये ऑटो एक्सपो मध्ये झळकवण्यात आली होती. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या इलेक्ट्रिक कारची किंमत 8.25 लाख रुपये असू शकते. तसेच कारमध्ये 40Kw इलेक्ट्रिक मोटर दिली गेली आहे. जी 53bhp ची पॉवर आणि 120Nm चे टॉर्क जनरेट करणार आहे. त्याचसोबत ही एसयुवी 100 ते 150 किमी रेंज देण्यास सक्षम असणार आहे.

टाटा कंपनीने नुकतेच त्यांचे Tata Altroz चे टर्बो पेट्रोल मॉडेल मार्केटमध्ये लॉन्च केले आहे.  त्याचे नाव Altroz iTurbo असे आहे. अशातच कंपनी लवकरच याचे प्रीमियम हॅचबॅकचे इलेक्ट्रिक वर्जन मार्केटमध्ये घेऊन येणार आहे. जी या वर्षात लॉन्च केली जाऊ शकते. लूक आणि डिझाइन बद्दल Tata Altroz  इलेक्ट्रिक सध्याच्या फ्यूल मॉडेल सारखे असणार आहे. पण याच्या फिचर्समध्ये बदल करण्यात येणार आहेत. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, Tata Altroz EV फुल चार्ज झाल्यानंतर 300 किमी रेंज देण्यास सक्षम असणार आहे.(Kia Motors भारतात लवकरच लॉन्च करणार स्वस्त 7 सीटर MPV, Ertiga सोबत होणार थेट टक्कर)

Renault kwid Electric  सध्याच्या क्विडचे ही इलेक्ट्रिक रुप आहे. कंपनी क्विडच्या इलेक्ट्रिक मॉडेलवर गेल्या काही काळापासून  काम करत आहे. Renault kwid Electric  सध्या क्विडच्या डिझाइन आणि पॅटर्नसह लॉन्च केली जाऊ शकते. परंतु ती कशा पद्धतीची असणार याबद्दल कोणताही माहिती समोर आलेली नाही. परंतु असे बोलले जात आहे की, 150 ते 200 किमी रेंजसह ही कार मार्केटमध्ये लॉन्च केली जाऊ शकते. रिपोर्ट्सनुसार, कंपनी ही कारला CMF-A प्लॅटफॉर्मवर तयार करत आहे.