Kia Sonet सारखी कॉम्पॅक्ट एसयुवी आणि Kia Seltos सारखी मिडसाइज SUV भारतात पॉप्युलर ठरलेली कंपनी Kia Motors लवकरच कमी किंमतीत एक धमाकेदार MPV Kia KY लॉन्च करणार आहे. जी 7 सीटर असून Matruti Suzuki Ertiga सारख्या दमदार 7 सीटर एमपीवी आणि Toyota Innova Crysta सारख्या मिड रेंज एमपीवीला थेट टक्कर देणारी ठरणार आहे. नुकत्याच किआ ने या कारची झलक दाखवली असून जी भारतात लॉन्च करण्यासंदर्भात आता चर्चा सुरु झाल्या आहेत.
Kia Motors च्या मिडसाइज एमपीवी किआ सेल्टॉच्या प्लॅटफॉर्मवर डेव्हलप केली जाणार असून याचे डिझाइन सेल्टॉस सारखेच असणार आहे. भारतात All New Hyundai Creta सुद्धा याच प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. ज्याच्या एमपीवीच्या मजबुतीचा अंदाज लावता येईल. कंपनीने या कारमध्ये अधिक स्पेस ठेवण्याचा प्रयत्न केला असून कोणतीही समस्या उद्भवू नये असा त्यांचा उद्देश आहे.(Honda कंपनी लवकरच भारतात घेऊन येणार नवी SUV, जबरदस्त लूकसह Tata Harrier ला देणार टक्कर)
असे म्हटले जात आहे की, किआ मोटर्स आपल्या नव्या एमपीवी ही 6 किंवा 7 सीटरच्या ऑप्शनमध्ये लॉन्च करु शकते. ज्यामध्ये 6 सीटर मिडल रो कॅप्शन सीट्स आणि 7 सीटर मध्ये बेंच टाइप सीट्स दिल्या जातील. त्याचसोबत फ्लॅक्सिबल सिटींग ऑप्शन आणि फोल्डेबल फिचर्स ही दिले जाणार आहेत.
Kia Motors ची नवी एमपीवी Kia KY च्या इंजिन संदर्भात बोलायचे झाल्यास यामध्ये 1.5 लीटरचे नॅच्युरली एस्पिरेडेट पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. जे 113bhp ची पॉवर आणि 144Nm चे टॉर्क जनरेट करु शकणार आहे. किआ केवाय मॅन्युअलसह ऑटोमॅटिक गिअरबॉक्स सोबत ही लॉन्च केली जाऊ शकते.
किआ मोटर्सची नवी एमीवी मध्ये सेल्टॉस सारखे फिचर्स असू शकतात. ज्यामध्ये स्मार्ट कनेक्टिव्हिटी असणारा मोठा टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टिम, डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर, क्रुज कंट्रोल, ऑटोमॅटिक एसी, रियर पार्किंग कॅमेरा, सीट बेल्ट रिमांडर, एअरबॅग्स सह अन्य काही स्टँडर्ड आणि सेफ्टी फिचर्स मिळू शकतात. तर Kia KY 7 Seater भारतात 11 लाख ते 18 लाख रुपयांदरम्यान लॉन्च केली जाऊ शकते. जी मारुती सुजुकी एर्टिगा आणि टोयोटा इनोव्हा क्रिस्टाची रेंज आहे. असा दावा केला जात आहे की, 2022 च्या सुरुवातीच्या महिन्यामध्येच भारतात लॉन्च केली जाऊ शकते.