जपानची वाहन निर्माती कंपनी होंडा भारतासाठी एका नव्या एसयुवीवर (HR-V) काम करत आहे. नुकत्याच समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, होंडा कंपनीची ही नवी कार जीप कंम्पास आणि टाटा हॅरियर सारख्या दमदार सेगमेंट मध्ये आपली जागा बनवणार आहे. अन्य देशात ही कार कंपनीकडून सेल केली जात आहे. परंतु पुढील वर्षात त्याला मोठे अपडेट दिले जाणार आहे. नवे मॉडेल आधीपेक्षा आकाराने मोठे आणि काही धमाकेदार फिचर्स लैस असणार आहे.(Honda च्या नव्या क्रुजर बाईकसाठी Down Payment शिवाय घरी आणता येणार, कंपनीकडून EMI चा ऑप्शन उपलब्ध)
2021 होंडाच्या नव्या ग्लोबल प्लॅटफॉर्मवर तयारी केली जाणारी ही पहिली प्रोडक्शन कार असमार आहे. कार निर्मात्यांनी आधीच पुष्टी केली आहे की, नव्या आर्किटेक्चर आधारित असलेली ही कार आशियाई क्षेत्र आणि दक्षिण अमेरिकेतील देशांसाठी डिझाइन केले जाणार आहे. तर नवी स्केलेबल प्लॅटफॉर्म 2025 पर्यंत ब्रँन्ड 30 टक्के मॅन पॉवर लागणारे तास वाचवण्यास सक्षम असमार आहे.(Maruti, Hyundai आणि Mahindra च्या गाड्या 1 जानेवारी पासून महागणार, जाणून घ्या कारण)
नवी होंडा HR-V सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत आकाराने मोठी असणार आहे. कॅबिन मध्ये अधिक स्पेस ही दिला जाणार आहे. कंपनीकडून या कारमध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजिन व्यतिरिक्त दोन इलेक्ट्रिक मोटर्सचा वापर केला जाऊ शकतो. अन्य देशात ही कार 3 इंजिन ऑप्शनसह उतवरण्यात आली आहे. त्यामध्ये 1.5 लीटर टर्बो पेट्रोल, 1.8 लीटर नॅच्युरल एस्पिरेटिड आणि 1.5 लीटर डिझेल इंजिनचा समावेश आहे. असे मानले जात आहे की, कंपनी याचे प्रोडक्शन मार्च पासून सुरु करणार आहे. तर भारतीय बाजारात 2021 च्या अखेरपर्यंत लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे.