2020 Mahindra Thar SUV (Photo Credits-Twitter)

भारतात 2021 हे वर्ष सुरु होण्यापूर्वी बहुतांश कार निर्माता कंपन्या त्यांच्या प्रोडक्ट लाइन अपच्या किंमतीवर वाढ करणार असल्याची शक्यता आहे. यापूर्वी दक्षिण कोरियाची वाहन निर्माती कंपनी किआ मोटर्सने (Kia Motors) घोषणा केली आहे की, त्यांच्या वाहनांच्या किंमतीत वाढ केली जाणार आहे. त्यानंतर आता मारुती(Marti), महिंद्रा (Mahindra) आणि ह्युंदाई (Hyundai) सुद्धा आपल्या कारच्या किंमतीत वाढ करणार असल्याचे कंपनीकडून जाहीर करण्यात आले आहे.(Honda च्या पॉप्युलर सेडानवर दिला जातोय 2.50 लाखांचा बंपर डिस्काउंट, जाणून घ्या किंमतीसह खासियत)

किआ मोटर्स इंडिया बद्दल बोलायचे झाल्यास दक्षिण कोरियाची वाहन निर्मात्यांनी याबद्दल अद्याप सांगितलेले नाही की किंमतीत कितीने वाढ केली जाणार आहे. किआ मोटर्सने आपल्या डिलर्सला हे सांगितले आहे की, ते जानेवारी पासून त्यांच्या सेल्टोस आणि सॉनेट एसयुवीच्या किंमतीत वाढ करणार आहेत. तर किंमतीत वाढ करण्यामागील कारण म्हणजे 2020 चा स्टॉक संपवण्यासह नव्या उत्सर्जन मानकांनुसार वाहनांवरील खर्च काढणे आहे.

दरम्यान, कंपनी त्यांची लग्जरी एमपीवी कार्निवलच्या किंमतीत वाढ करण्यापासून दूर ठेवले जाणार आहे. म्हणजेच या कारच्या किंमतीत कोणतीही वाढ केली जाणार नाही आहे. अशातच महिंद्रा अॅन्ड महिंद्रा लिमिटेड यांनी आज त्यांच्या प्रवासी आणि वाहतुकीच्या वाहनांच्या किंमतीत वाढ करणार असल्याचे घोषित केले आहे. म्हणजेच ज्या ग्राहकांना 1 जानेवारी 2020 पासून जी डिलिव्हरी केली जाईल त्यावेळी त्यांना वाढलेली किंमत मोजावी लागणार आहे.(नवी MPV Suzuki Solio Bandit लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत)

ह्युंदाई इंडियाने सुद्धा नव्या वर्षात त्यांच्या आपल्या कारच्या मॉडेलच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहन निर्मात्यांनी असे म्हटले आहे की, 1 जानेवारी पासून किंमती वाढलेल्या असणार आहे. जे मॉडेल आणि वेरियंटस इंधनाच्या प्रकारावर आधारित वेगवेगळी असणार आहे. त्याचसोबत मारुतीने सुद्धा त्यांच्या किंमतीत वाढ करणार आहेत. मात्र याबद्दल लवकरच अधिकृत पद्धतीने घोषणा करणार आहे.