Honda च्या पॉप्युलर सेडानवर दिला जातोय 2.50 लाखांचा बंपर डिस्काउंट, जाणून घ्या किंमतीसह खासियत
Honda (Photo Credits-twitter)

2020 हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. अशातच ऑटोमोबाईल कंपन्यांनी भारतात त्यांच्या पॉप्युलर कारवर डिस्काउंट ऑफर देणे सुरु केले आहे. याच कंपन्यांपैकी एक Honda Cars India जे आपली पॉप्युलर कार Honda Civic वर बंपर डिस्काउंट ऑफर करत आहे. ज्यामध्ये ग्राहकांना लाखो रुपयांचा फायदा होणार आहे. या डिस्काउंटचा लाभ तुम्हाला संपूर्ण डिसेंबर महिन्यात घेता येणार आहे. तर होंडा सिविक या कारच्या किंमतीसह खासियत बद्दल येथे अधिक जाणून घ्या.

कारच्या इंजिन आणि पॉवर बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये पेट्रोल आणि डिझेल असे दोन्ही ऑप्शन दिले जाणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना आपल्या पसंदीनुसार ती खरेदी करता येणार आहे. पेट्रोल वर्जनसाठी यामध्ये 1.8 लीटरचे i-VTC इंजिन दिले आहे. जे CVT ऑटोमेटिक गिअरबॉक्सला जोडले गेले आहे. हे इंजिन 6500rpm वर 139bhp ची पॉवर आणि 4300rpm वर 174Nm चा टॉर्क जनरेट करणार आहे. मायलेज बद्दल कंपनीने असा दावा केला आहे की, पेट्रोल मॉडेल 16.5kmpl चे मायलेज देणार आहे.(Hyundai ची Santro, Grand i10, Aura कारवर ग्राहकांना मिळणार 1 लाखांपर्यंत सूट)

डिझेलसाठी यामध्ये 1.6 लीटरचे i-DTEC इंजिन दिले आहे. जे 4000rmp वर 118bhp ची पॉवर आणि 2000rpm वर 300Nm चे पीक टॉर्क जनरेट करणार आहे. या इंजिनसह 6 स्पीड म्यॅन्युअल गिअरबॉक्स ही दिले आहे.(Datsun च्या 'या' फॅमिली कारवर दिला जातोय 51 हजारांचा बंपर डिस्काउंट, जाणून घ्या किंमतीसह खासियत)

ऑफर्स बद्दल सांगायचे झाल्यास Honda Civic वर कंपनीकडून 2.50 लाखांचा कमीतकमी डिस्काउंट दिला जाणार आहे. या डिस्काउंटमध्ये पेट्रोल इंजिन मॉडेलवर पूर्णपणे 1 लाख रुपयांचा कॅश डिस्काउंट मिळणार आहे. तर डिझेल इंजिन मॉडेलच्या सर्व वेरियंट्सवर 2.50 लाखांचा कॅश डिस्काउंट मिळणार आहे. मात्र या ऑफर अंतर्गत काही नियम आणि अटी सु्द्धा लागू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कार खरेदी करण्यापूर्वी जवळच्या डिलरशिप सोबत संपर्क साधून याबद्दल अधिक माहिती मिळवावी.